गोवंश हत्या बंदी कायद्यातील जाचक अटी रद्द करा, सोलापुरात संतप्त मोर्चा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गोवंश हत्या बंदी कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी आज सोलापुरात एक भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पशुपालक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली.
पूनम गेट येथे हा मोर्चा संपणार असून शहरातील मुख्य मार्गांवरून मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चामध्ये भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा तसेच निळा, भगवा आणि पिवळा रंग असलेले झेंडे मोठ्या प्रमाणात फडकवण्यात आले. या मोर्चामध्ये सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या १० ते १५ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग पाहायला मिळत आहे. मोर्चात सहभागी झालेले शेतकरी आणि पशुपालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, त्यांनी गोवंश हत्या बंदी कायद्यातील अंमलबजावणीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
नागरिकांनी निळ्या, भगव्या, पिवळ्या झेंड्यांसह घोषणाबाजी करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
0 Comments