माढा-कुर्डूवाडी रस्त्यावर एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एक ठार, १५ हून अधिक जखमी
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा-कुर्डूवाडी रोड येथील वळणाजवळ आलिशान कार व एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
वैरागहून बोरवलीकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी माढ्यातील वळणाजवळ येत असताना कुर्डूवाडीहून येणाऱ्या कारचा अपघात झाला. यामध्ये एसटी बसमधील १४ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर कारमधील एक जण मयत झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments