Hot Posts

6/recent/ticker-posts

शेटफळच्या लेझीम संघाकडून जरांगेंचे स्वागत

 शेटफळच्या लेझीम संघाकडून जरांगेंचे स्वागत



वाशिंबे : (कटूसत्य वृत्त):- 
मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी करमाळा तालुक्यातील विविध गावांतून हजारो कार्यकर्ते मुंबईच्या आझाद मैदानाकडे गेले आहेत. जरांगे मैदानात येण्यापूर्वी तालुक्यातील
शेटफळ येथील लेझीम संघाने हलगीच्या तालावर ठेका धरत जरांगे यांचे मैदानात स्वागत केले. करमाळातील शेटफळच्या तरुणांनी आंदोलनापूर्वीच आझाद मैदान गाजवले आहे.
जरांगे यांच्या आव्हानानंतर अवघ्या महाराष्ट्रातून तरुणाई मुंबईकडे धावल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले. यामध्ये करमाळा तालुकाही मागेही नाही. करमाळा तालुक्याच्या विविध गावांतून हजारो कार्यकर्ते या आंदोलनासाठी मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामध्ये शेटफळ तालुका करमाळा येथील नागनाथ लेझीम संघाचे कार्यकर्ते अग्रभागी असून म्हणून जरांगे मैदानात
येण्यापूर्वीच या लेझीम संघाने मैदानात हलगीच्या तालावर लेझीम खेळण्यास सुरुवात केली. त्यांच्याबरोबर इतर गावच्या कार्यकर्त्यांनीही हलगीच्या तालावर ठेका धरला. जरांगे हे उपोषणाला मैदानात येताना त्यांचे जल्लोषात स्वागत या लेझीम संघाने केले. याची दखल महाराष्ट्रातील प्रमुख मीडिया प्रतिनिधींनी आहे.
गावातून सहा वाहनांद्वारे ६० ते ७० कार्यकर्ते यापूर्वीच रवाना झाले होते. रात्री रेल्वेने ४० कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उतरून त्यांनी थेट आझाद मैदानात जाऊन लेझीमचा डाव धरला व तिथे वातावरण निर्मितीला सुरुवात केली होती.

Reactions

Post a Comment

0 Comments