Hot Posts

6/recent/ticker-posts

योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या कृपादृष्टीनेच जीवन धन्य

 योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या कृपादृष्टीनेच  जीवन धन्य



सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात सेवा करण्याचे भाग्य मिळाल्याने जीवन सार्थकी लागले असे प्रतिपादन नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले.
नुकतेच श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने अण्णाराव कुंभार  यांना काशी पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डाॅ.मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या अमृत हस्ते 'श्री होटगीश्वर चिंतामणी रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. त्याप्रित्यर्थ श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ग्रुपच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना अण्णाराव कुंभार बोलत होते.   
यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिधद रोडगीकर, राजकुमार भोरे, सुभाष धुमशेट्टी, रत्नमाला उकरंडे , सुनंदा मठपती यांच्यासह ३२ सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. नेताजी प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार व राजराजेश्वरी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी श्री बृहन्मठ होटगीच्या संस्थेच्या सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनींच्यावतीने जेष्ठ शिक्षक शिवशरण बिराजदार, सोमनिंग कोष्टी यांच्या हस्ते अण्णाराव कुंभार यांचे शाल,पुष्प गुच्छ, हार व बुके देऊन सत्कार करण्यात आला. 
यावेळी रोडगीकर, भोरे, धुमशेट्टी, मठपती आदींनी मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यल्लप्पा व्हनकडे यांनी केले तर विश्वाराध्य  मठपती यांनी आभार मानले केले. जुन्या सहकारी शिक्षकांशी सुखदुःखाच्या चर्चा झाल्याने  सर्व सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी आनंदीत दिसून आले.राजमाने , पटेल, हुल्ले, व्हनकडे, यादव, उपासे , स्वामी, पाटील, सुतार , कोनापुरे, तेग्गेळी,म्हमाणे, देशमुख, बिजली,महादेव माळी, स्वामी, खसगी ,पाटील ,राजोळ,रामपुरे,काटकर यांच्यासह ३२ सेवानिवृत्त शिक्षक आदी उपस्थित होते

Reactions

Post a Comment

0 Comments