Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूरवरील महापुराचे संकट टळलं; उजनी धरणातून कमी पाण्याचा विसर्ग

 पंढरपूरवरील महापुराचे संकट टळलं; उजनी धरणातून कमी पाण्याचा विसर्ग




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे परिसरातील पाऊस थांबल्याने उजनीतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा कमी होण्यास सुरुवात झालीआहे . परिणामी पंढरपूर वरील महापुराचा धोका टळला आहे.

मात्र, असे असले तरी चंद्रभागा ही धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली असून सध्या पात्रात एक लाख 90 हजार क्युसेक विसर्गाने पाणी वाहत आहे.

दरम्यान, पुणे परिसरातील पाऊस कमी झाल्याने उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी उजनी धरणातून एक लाख पस्तीस हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे. मात्र उजनीकडे येणारा विसर्ग 80 हजारपर्यंत कमी झाल्याने आज दुपारपर्यंत भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ही कमी होणार आहे. मात्र चंद्रभागा आपल्या रौद्ररूपात वाहत असताना भाविक अत्यंत धोकादायक पद्धतीने स्नान करतानाचे धक्कादायक चित्र अनेक घाटांवर दिसत आहे.

दुसरीकडे. काल (22 ऑगस्ट) सोडलेल्या पाण्यामुळे कर्नाटककडे जाणाऱ्या गोपाळपूर येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कर्नाटकची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments