कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्याल्याच्या प्रक्षेत्रामध्ये विविध कृषिविषयक कामाचा शुभारंभ
बार्शी (कटूसत्य वृत्त):- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शीच्या प्रक्षेत्रामध्ये विविध कृषि विषयक प्रकल्पांच्या कामाचा शुभारंभ शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी. वाय. यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, सहसचिव अरूण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारिणी सदस्य विष्णू पाटील, चंद्रकांत मोरे, शशिकांत पवार, शिवाजी शेळवणे, गुलाबराव पाटील, दिलीप मोहिते, डॉ. सर्जेराव माने आणि प्रगतशील शेतकरी व मार्गदर्शक नितीन कापसे, प्राचार्य डॉ. डि.बी. शिंदे ,मार्गदर्शक भागवत चव्हाण , तानाजी मोरे .प्रा गलांडे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये शेततळे, अंतर्गत रस्ते, रोपवाटीका, इत्यादी कामाचे भुमिपुजन करण्यात आले.विद्यार्थ्यांना शेतीमधील प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेता यावा तसेच आधुनिक शेतीमधील विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर या प्रक्षेत्रावरती करण्यात येणार आहे.

0 Comments