संजय शिरसाट व भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते न्यू आर्या हॉटेल चे उद्घाटन
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील मौजे नातेपुते येथील न्यू आर्या हॉटेल चे उद्घाटन प्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ व राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा फलोत्पादन व रोजगार हमी विकास खारभुमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते न्यू आर्या हॉटेलचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या उद्घाटनप्रसंगी विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,आमदार उत्तमराव जानकर,आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे,नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अनिता लांडगे,जिल्हाप्रमुख चरण चवरे,शिवसेना नेते एकनाथ कर्चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीएसओ राहुल वाघमोडे पाटील, भाजप नेते बाळासाहेब सरगर,गौतम माने पाटील,ओबीसी नेते भिमराव भुसनर, दादासाहेब लोखंडे माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील राम लक्ष्मण महाराज, डाॅ.कवितके,दत्तामाई कर्चे माळशिरस तालुक्यातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी सह नातेपुते येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments