उजनी येथे आ. अभिजीत पाटील यांच्या हस्ते गौरी पाणबुडे हिचा सत्कार
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील उजनी (टें), येथील गौरी विष्णू पाणबुडे हिची राज्याच्या कॉर्फबॉल संघात निवड होऊन चेन्नई तमिळनाडू येथे घेण्यात आलेल्या सामन्यात संघाने प्रथम क्रमांका सह सुवर्णपदक मिळवून देश पातळीवर निवड झाल्याबद्दल आमदार अभिजित पाटील यांनी उजनी (टे),येथील पाणबुडे यांच्या घरी रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी उपस्थित राहून सत्कार केला.
ग्रामीण भागातील गौरी पाणबुडे हिने कॉर्फबॉल मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून राज्याच्या संघात आपले अस्तित्व सिद्ध करून गावाचे, राज्याचे व आपल्या आई वडिलांचे नाव रोशन केले,तिची अशीच उतुंग भरारी पुढे सुरू रहावी. व आपल्या राज्याचे नाव देश पातळीवर अधोरेखित करावे. यासाठी आम्हीं सदैव सोबत राहून सर्वतोपरी सहकार्य करू असे आमदार अभिजीत पाटील यांनी आश्वस्त केले.
गौरी पानबुडे व इतर दहा खेळाडू यांनी चेन्नई तामिळनाडू येथे राष्ट्रीय कॉर्फबॉल सामना २४ जुलै ते २६ जुलै रोजी खेळून प्रथम क्रमांका सह सुवर्णपदक मिळविले होते.
सचिन जगताप म्हणाले जिजाऊच्या लेकींच्या पाठीमागे संभाजी ब्रिगेड सदैव ठामपणे उभी असून गौरी ने अशीच उतुंग भरारी घ्यावी व पुढील वाटचालीस शुभेच्छा राहतील.
सत्कार समारंभ प्रसंगी रावसाहेब देशमुख, डी व्ही पी बँकेचे चेअरमन औदुंबर देशमुख, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, धरणग्रस्थ संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, राज्य विक्रीकर अधिकारी धनश्री डूचाल, विनायक केचे, प्रांजली स्पोर्ट अॅकॅडमीचे संस्थापक शंकर बाबर, हमाल पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मण बागल, डॉ. रमेश जाधव उजणी (मा), सुनिल डूचाळ, संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका उपाध्यक सचिन पराडे-पाटील, विजय मस्के, श्रीमंत भराडे, मोहन काटे, दशरथ जगताप, हनुमंत डूचाळ, नवनाथ भोसले, पिंटूदादा ताटे, भगवंत शिंदे, रामदास गलांडे, हरिदास काळे, आण्णा पानबुडे, महेश पानबुडे, संतोष पानबुडे, विठ्ठल मेटे, परशुराम नवले, निलेश मेटे, ज्योतीराम मेटे, परमेश्वर मेटे, हरि कवडे, कालीदास शिरतोडे, सचिन गायकवाड, आप्पा माने, समाधान जाधव, पंढरीनाथ काळे, जीवनदास मेटे, नानासो मेटे, मयुर नवले, देविदास नवले यांच्या सह उजनी ग्रामस्थ, पैपाहुणे, मित्र परिवार यांनी उपस्थित राहून गौरी चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चौकट
उजनी (टें) येथील मा. सरपंच विठ्ठल मेटे सह परिवार यांनी माढा विधानसभेचे आ. अभिजीत आबा पाटील यांना घरी बोलवून केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विधानसभेच्या इलेक्शन आगोदर गाव भेट दौऱ्यावेळी आपल्या घरी चहा घेऊन गेलो होतो अशी आठवण यावेळी आ अभिजीत पाटील यांनी आवर्जून जागृत केली. तालुक्यातील छोट्याशा गावात दिलेली चहापाण्याची भेट विसरले नाहीत, याचे सर्वांना आश्चर्य वाटले.
0 Comments