अकलुज पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कौतुकास्पद कामगिरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 7, 2025

अकलुज पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कौतुकास्पद कामगिरी

 अकलुज पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कौतुकास्पद कामगिरी




अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज पोलीस स्टेशन कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौतुकास्पद कामगिरी केली असून,१४ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह महिला आरोपींना घेतले ताब्यात.
   अकलूज पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०४/०८/२०२५ रोजी दुपारी ०१.३० वाचे सुमारास फिर्यादी महिला या अकलुज बस स्थानक येथुन बसने पुणे येथे जाण्यासाठी निघाले असताना बस मध्ये चढताना गर्दीमध्ये कोणीतरी अज्ञाताने फिर्यादी यांच्या पर्समधील सोन्याच्या बांगडया व गंठन असा अंदाजे १० लाख रुपये किंमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे चोरी केले होते. त्यावरुन अकलुज पोलीस ठाणे गुरन नंबर ५४५/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हा नोंद होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ अकलुज बस स्थानक, अकलुज नगरपरिषद सीसीटिव्ही व रस्त्यावरील दुकानाची सीसीटिव्ही कॉमे-याची पाहणी केली असता ४ संशयीत महिला या रिक्षाने टेंभुर्णी रोडने गेल्याचे दिसुन आले अकलुज ते टेंभुर्णी रोडवरील तसेच टेंभुर्णी शहरातील असे एकुण ३० ते ३५ सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन व त्यांचे तत्रिंक विश्लेषण करुन त्याव्दारे टेंभुर्णी येथुन पळुन जाण्याच्या तयारी असताना महिला नामे १) एकता कैलास उपाध्ये वय -२४ वर्षे राहणार मेडिकल कॉलेज शेजारी बापुनगर सेडमनगर कलबुर्गी सध्या राहणार वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर येरवडा पुणे २) ननीता दिनेश कांबळे वय ३५ वर्षे राहणार वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर येरवडा पुणे ३) सुनिता शाखा सकट वय -४५ राहणार - वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर येरवडा पुणे ४) आरती मेघराज उपाध्य वय ३० वर्षे राहणार वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर येरवडा पुणे यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली त्यांचेकडुन वर नमुद गुन्हयातील चोरी केलेला १० तोळे व यापुर्वी अकलुज बस स्थानाकातुन ३ वेगवेगळ्या गुन्हयातील चोरी केलेले चार तोळे असे एकुण अंदाजे १४ लाख रुपये किंमतीचे १४ तोळे वजानाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर महिला या सराईत असुन यांचेवर यापुर्वी आंळद पोलीस ठाणे राज्य कर्नाटक, वाई पोलीस ठाणे जिल्हा सातारा, वारजे माळेवाडी, शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर असे वेगवेगळे पोलीस ठाणेस गुन्हे नोंद आहेत.

सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,  अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज विभाग अकलुज नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे, सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहा. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे, पोलीस हवालदार सुहास क्षिरसागर, शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, विनोद साठे, सिध्दु कंटोळी, बबलु गाडे, मपोहे मंदाकिनी चव्हाण, चालक राहुल नागरगोजे, पोलीस अमंलदार सोमनाथ माने, रणजित जगताप, प्रविण हिंगणगावकर, महिला पोलीस अमंलदार पुनम शिंदे यांनी कामगिरी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages