खा.मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाने श्रीहरीनगर येथे अंडरपासला मंजूरी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील श्रीहरीनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अंडरपास (बोगदा) उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने केली होती.
नागरिकांच्या या मागणीची दखल घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, श्रीहरीनगर येथे पालखी महामार्गावरील अंडरपासला मंजुरी मिळाली आहे.
हा अंडरपास स्थानिक नागरिकांसह शाळकरी विद्यार्थी, वृद्ध, महिला आणि रोजच्या दैनंदिन प्रवासासाठी सुरक्षित आणि सुलभ पर्याय ठरणार आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होणार असून, अपघातांचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे. अंडरपासला मंजुरी मिळून दिल्याने स्थानिक ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे आभार मानले आहेत.
0 Comments