सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या वतीने '' नशामुक्त भारत अभियन ''
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वत्र दिनांक 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत '' नशामुक्त भारत अभियन '' अंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापने वरील कार्यरत असलेल्या सर्व पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील कॉलेज व शाळे मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी मध्ये जनजागृती व्हावी या करीता कार्यशाळेचे आयोजन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
प्राप्त निर्देशा नुसार दिनांक 14.08.2025 रोजी दुपारी 01.00 ते 03.00 वा.दरम्यान सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील एन. के. ऑर्किड, इंजिनिअरींग कॉलेज, तळेहिप्परगा येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी मध्ये नशामुक्त भारत अभियना अंतर्गत जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर जनजागृती कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण हे होते.
सदर जनजागृती कार्यशाळे करीता सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे, सोमनाथ कदम, सहायक पोलीस निरीक्षक, महेश घोडके, पोलीस उपनिरीक्षक, डॉ.बी.के.सोनगे, प्राचार्य, एन.के.आर्किड इंजिनिअरींग कॉलेज, तळेहिप्परगा, श्रीनिवास मेतन, उपप्राचार्य व कॉलेज मधील सुमारे 500 विद्यार्थी उपस्थित होते.
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचा प्राचार्य, एन.के.आर्किड इंजिनिअरींग कॉलेज, तळेहिप्परगा यांनी शाल,श्रीफळ व वृक्ष देऊन सत्कार केला. राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सो.ता.पो.ठाणे यांनी कार्यशाळेचे प्रस्तावना करून कार्यशाळा घेण्याचा उद्देश समजावुन सांगितला.
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी उपस्थित विद्यार्थीना त्यांनी त्याचे अभ्यासाकडे लक्ष पुरवावे, कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊन नशा करू नये, नशा फक्त शरीर नाही तर भवितव्य नष्ट करतो, यश पाहिजे असेल तर नशा टाळा, नशेमुळे त्याचे व कुटुंबियांचे नुकसान होते वगैरे मोलाचे मार्गदर्शन केले.
सोमनाथ कदम, सहायक पोलीस निरीक्षक यांनी सर्व विद्यार्थी यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ दिली. श्रीनिवास मेतन, उपप्राचार्य, एन.के.आर्किड इंजिनिअरींग कॉलेज, तळेहिप्परगा यांनी आभार व्यक्त केले. कार्यशाळा संपन्न झाले नंतर कॉलेजच्या परिसरात अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे हस्त विविध प्रकारच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व दिपक चव्हाण, अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे, पोनि/सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली जनजागृती कार्यशाळा पार पाडणे करीता सपोनि/सोमनाथ कदम, पोसई/महेश घोडके, सपोफौ/बाणेवाले, पोहवा/ जगताप, डॉ.बी.के.सोनगे, प्राचार्य व श्रीनिवास मेतन, उपप्राचार्य, प्राध्यापक यश पवार, एन.के.आर्किड इंजिनिअरींग कॉलेज, तळेहिप्परगा यांनी परिश्रम घेतले.
0 Comments