खा. प्रणिती शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या दिल्या सूचना. खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले, वडाळा, कारंबा, नान्नज या अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हातातील पीक डोळ्यादेखत नष्ट होत आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान प्रचंड आहे. त्यांच्या यातना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. महसूल प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे, नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत. खरीप पिकांसोबत द्राक्षबागांच्या नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी मी प्रयत्न करेन. तहसीलदार आणि कृषी विभागाने सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.असे सांगितले.सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आलेले हे संकट गंभीर असून, त्यांना दिलासा मिळण्यासाठी शासनाने तात्काळ पुढाकार घ्यावा,अशी अपेक्षा खासदार प्रणितीताई शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी काही शेतकऱ्यांनी ई- पिक पाण्याची नोंद सर्व्हर डाऊन असल्याने अडथळा होत असल्याची व पीक विमा योजनेबाबत तक्रार केली. यावर बोलताना म्हणाल्या ऑनलाईन ई - पिक पाणी नोंद व इतर अटी रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.
0 Comments