Hot Posts

6/recent/ticker-posts

उजनी धरण झाले फुल्ल; पुणे,सोलापूर नगरकरांची चिंताच मिटली

 उजनी धरण झाले फुल्ल; पुणे,सोलापूर नगरकरांची चिंताच मिटली   



  

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी मानलं जाणारं उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरलं आहे. पाटबंधारे विभागाने आज सकाळी सहा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार, धरणातील पाणीसाठा 116.99 टीएमसीवर पोहोचला होता. टक्केवारीत 99.56 टक्के होता.117 टीएमसी पाणीसाठ्यावर उजनी धरण पूर्ण क्षमतेला पोहोचते. दुपारी तो टप्पा पार करीत उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

उजनी धरण हे नदी आणि कालव्यांच्या माध्यमातून पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचे अनियमित प्रमाण, वारंवार पडणारे दुष्काळी सावट आणि वाढत्या पाण्याच्या मागणीमुळे उजनी धरण भरण्यासाठी पूर्ण क्षमता गाठणं अवघड झालं होतं. मात्र यावर्षी पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यातच चांगल्या पावसामुळे धरणात जलसाठा जलद गतीने वाढत गेला.
Reactions

Post a Comment

0 Comments