सामाजिक न्याय विभागाचा तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या प्रगतीचा निधी इतरत्र न वळवता बजेटचा कायदा करण्यात यावा- प्रमोद शिंदे
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सामाजिक न्याय विभागाचा तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या प्रगतीचा निधी इतरत्र न वळवता त्यासाठी बजेटचा कायदा करण्यात यावा या संदर्भाची मागणी महाराष्ट्र परिवार व एन डी एम जे राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे सोलापूर दौऱ्यावर आले असताअनुसूचित जाती जमातीच्या प्रगतीसाठी सामाजिक न्याय विभागाकडे निधी उपलब्ध करून दिला जातो परंतु हा निधी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या प्रगतसाठी न वापरता इतर कारणांसाठी वळवला जातो त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या प्रगतीमध्ये अडथळा येत आहे. सतत नेहमी महाराष्ट्र शासनाकडून कोणत्या ना कोणत्या कारणावरून अनुसूचित जाती जमातीचा दरवर्षी कोट्यावधींचा निधी इतरत्र वळवला जातो मागच्या आठवड्यात सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी कोठ्यावधींचा निधी वळवला गेला आहे. तो निधी पुन्हा अनुसूचित जाती जमातीच्या प्रगतीसाठी वापरण्यात यावा व लाडक्या बहिणीसाठी स्वतंत्र निधीची उभारणी करण्यात यावी.सामाजिक न्याय विभागा मधील निधी इतर ठिकाण वळवून अनुसूचित जाती जमाती च्या लोकांवर शासनाकडून अन्याय केला जात आहे.हा अन्याय रोखण्यासाठी शासनाने बजेटचा कायदा पारित केला पाहिजे जेणेकरून सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर कोणत्याही ठिकाणी वळवता येणार नाही. असं न केल्यास भविष्यात आपणास अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या आरोशास मोर जावे लागेल. पण सामाजिक न्याय मंत्री असल्याकारणाने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन तात्काळ बजेटचा कायदा करून अनुसूचित जाती जमातीच्या हक्काचा निधी इतर ठिकाणी न वळवता तो फक्त अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या प्रगतीसाठीच वापरण्यात यावा अन्यथा भविष्यात तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन प्रत्यक्षात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना भेटून दिले यावेळी, सर्व रोजगार हमी व फलोउत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, आ.उत्तमराव जानकर,आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील, मा आमदार रामभाऊ सातपुते, तसेच मोठ्या प्रमाणात इतर पक्ष संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments