Hot Posts

6/recent/ticker-posts

सण उत्सवाच्या काळात वाहतूक कारवाईत शिथिलता द्या- संभाजी ब्रिगेड

 सण उत्सवाच्या काळात वाहतूक कारवाईत शिथिलता द्या- संभाजी ब्रिगेड




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात आगामी काळात गणेश उत्सव गौरी आगमन नवरात्र महोत्सव दिवाळी हे सण तोंडावर आले आहेत त्यामुळे पुरुष महिला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर  पडत आहेत पण चौकाचौकात वाहतूक पोलीस कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली नागरिकांची अडवणूक करून मोठ्या प्रमाणात दंड वसुली करीत आहेत त्यामुळे नागरिकात वाहतूक पोलिसाबाबत रोष निर्माण होत आहे तरी किमान सणासुदीच्या काळामध्ये वाहतूक नियम मात शिथिलता देण्यात येऊन वाहतुक कारवाई पासून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस उपयुक्त मुख्यालय गौहर हसन यांच्याकडे करण्यात आली आहे.

आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव गौरी आगमन नवरात्रोत्सव अशी मोठी सण उत्सव साजरा करण्यात येणार आहेत शासनाचे असे निर्णय आहेत की सहन उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात यावा या येणार्‍या सणासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी पुरुषाबरोबर महिलावर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्यांच्याबरोबर लहान मुलं सुद्धा असतात अशा वेळी चौकाचौकांमध्ये वाहतूक पोलीस त्यांना अडवून मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम वसुली करीत आहेत अशा वेळी महिला वर्गाकडे   पैसे असतात नसतात त्या कारवाईच्या भीतीने रडकुंडीला येऊन विनंती केली तरी वाहतूक पोलीस कारवाई करतात काही ठिकाणी हे वाहतूक पोलीस आपल्या पर्सनल मोबाईल मध्ये वाहनांचे फोटो काढून दंड आकारणी करीत आहेत अशा वाहतूक पोलीस कर्मचारी वर कारवाई करण्यात यावे
वाहतूक पोलिसांनी चौकातील वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करणे गरजेचे असून त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे काही चौकाचौका गल्ली गल्लीमध्ये चार-पाच वाहतूक पोलीस नागरिकाकडून कारवाईच्या नावाखाली दंड आकारणी करताना दिसतात शहरांमध्ये सध्या सण उत्सव दिवस असल्यामुळे प्रत्येक बाजारपेठ मुख्य चौकात वाहनांच्या वर्दळ मुळे वाहतूक  खोळंबा होत आहे त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त वाहतूक पोलिसांची नेमणूक करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे  अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे श्याम कदम वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम जिल्हा उपाध्यक्ष दिलीप निंबाळकर शहर उपप्रमुख फिरोज सय्यद इलियास शेख बालाजी काकडे आधी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments