सोलापूर जिल्ह्यातून मराठा आरक्षण आंदोलनासाठी 25 हजार गाड्या जाणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवानी या आंदोलनासाठी मुंबईला येण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातून सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्यातून सुमारे 25 हजार दु-चाकी, चार-चाकी मालवाहतुकीचे वाहने ट्रक्टर, पाण्याचे टँकर व अॅब्युलन्स घेऊन समाज बांधव मुंबईच्या दिशेने गुरुवार दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मुंबईच्या दिशेने निघणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हाचे माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सरकारने सगेसोयरेची अधिसूचना काढून कायद्यात रूपांतर करण्याचे मान्य केले होते.हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गैझेट अभ्यास करून लागू करण्याची भूमिका देखील सरकारनेच घेतली होती. यामुळे यामध्ये आता सरकारनेच भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. मराठा समाजाची ओबीसी आरक्षणाची मागणी असताना सरकारने एसईबीसी हा ओबीसी अंतर्गत प्रवर्ग बनवून 10 टक्के आरक्षण देणे आवश्यक होते मात्र सरकारने जाणीवपूर्वक ओबीसी बाहेरील घटनाबाह्य व बेकायदेशीर प्रवर्ग बनवून फसवे आरक्षण दिले आहे. ओबीसी तरुणांवर आंदोलनात दाखल गुन्हे सरकारने तात्काळ मागे घेतले मात्र मराठा आंदोलकांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झालेला असताना त्यांच्यावर खटले भरले आहेत.
ओबीसीना शालेय व उच्च माध्यमिक व पदवी शिक्षणासाठी जवळपास 7200 कोटी रुपये दिले जातात तर मराठा समाजाला फक्त 200 ते 300 कोटी दिलेले जातात. अण्णासाहेब पाटील महामंडळ 1.5 लाख तरुणाना कर्ज भेटले मात्र ते गेल्या 7 वर्षात सध्या सरकार चार - चार महीने व्याज परतावा देत नाही व बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. 15 ते 16 लाख तरुणानी 7 वर्षात अर्ज केल्यावर 1.50 लाख लोकांना कर्ज भेटले आहे हे वास्तव आहे, असा आरोप माऊली पवार यांनी केला आहे.
मराठा तरुणांच्यासाठी कुठे ही वस्तीगृह नाहीत उलट ज्या-ठिकाणी मराठा समाजाची मागणी आहे त्या जागा जाणिवपूर्वक ओबीसी वस्तीगृहासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.ओबीसी विद्यार्थी सरकारी व खाजगी शाळेत 50 टक्के मध्ये प्रवेश घेतात तर मराठा समाजाला आरक्षण मिळून देखील 100 टक्के फी भरावी लागते.
सध्या सरकारने निधी अडवला असल्याने सारथी संस्थेच्या अनेक योजना बंद असल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहेत.आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवून देखील खुल्या प्रवर्गात गुणवतेवर मिळत असलेल्या 9 टक्के जागा 10 टक्के % आरक्षण म्हणून दिल्या आहेत. या उलट 33.80 टक्के समाजाला 32 टक्के आरक्षण सुरु ठेवून मराठा आणि इतर जातीवर अन्याय केला आहे. समाजाच्या विविध मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात, अशी मागणी यावेळी माऊली पवार यांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेस डॉ. प्रमोद पाटील, सचिन तिकटे , राजन जाधव, ॲड. श्रीरंग लाळे आदी उपस्थित होते.
0 Comments