सपाटणे शिवारामध्ये बिबट्याची दहशत
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बंदोबस्त करण्याची मागणी
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- गेले दोन महिन्यांपासून सापटने टें व परिसरामध्ये बिबट्या ने अनेक पाळीव प्राण्यावर हल्ला केला आहे. यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये दोन लाख रुपये किमतीचे दादासाहेब माने यांच्या घोड्यावरती हल्ला करून तो त्या ठिकाणी ठार केला गेल्या दोन ते अडीच महिन्यामध्ये 13 ते 14 ठिकाणी पाळीव प्राण्यांमध्ये शेळ्या मेंढ्या गाई वासरे यांच्या वरती हल्ला करून शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे या परिसरामध्ये फळबागांची अतिशय मोठ्या प्रमाणात लागवड असून त्यामध्ये डाळिंब असतील केळी असेल पेरू असेल या शेतीतील कामासाठी शेतकरी रानामध्ये जात असताना या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे सापटणे टें परिसरातील शेतकरी भयभीत झाला असून तो रानामध्ये जाण्यास भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे . यावर ते वन विभागाने त्वरित कारवाई करावी अशी संतप्त मागणी या परिसरातील गावकऱ्यांची व शेतकऱ्यांची आहे कारण या परिसरामध्ये डाळिंब शेतीचे अतिशय मोठ्या प्रमाणात लागवड आहे आणि आजच्या या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आहे तसच शेतकरी दुहेरी संकटात या ठिकाणी सापडलेला आहे एकीकडे बिबट्याचा हल्ला आणि दुसऱ्या बाजूला डाळिंब फळबागाची राखण करण्यासाठी रात्रीचे त्या ठिकाणी जावे लागते आणि अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे.
या झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी माढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम ढवळे वन विभागाचे शुभम धायतडक, सरपंच रवी कुबेर, प्रगतशील बागायतदार पांडुरंग तात्या ढवळे ,उपसरपंच अमोल ढवळे संतोष नाना जगताप अक्षय ढवळे संजय माने दादासाहेब माने संजय शिंदे सावता कुबेर तानाजी कुबेर यांनी पाहणी केली.
0 Comments