१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शेळगी येथील श्री सदगुरु प्रभाकर महाराज सार्वजनिक वाचनालय येथे १५ ऑगस्ट २०२५, भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला मा.महादेव पाटील, माजी सभापती, परिवहन महामंडळ - यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम करण्यात आला.ध्वजवंदनास प्रमुख पाहुणे म्हणून, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबुराव नरुणे, उपाध्यक्ष अशोक खानापुरे सर, सचिव मनमथ कोनापुरे, सहसचिव शिवलिंग आप्पा शहाबादे, भीमराव गंगधरे,सुरेश तानवडे, राजशेखर पाटील, शेळगी जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापीका सुनंदा अंकुश काळे, आशा सोमद्ळे मॅडम, संतोष जाधव सर, ईश्वरी गौरी, आरती स्वामी, रूपेश हिप्पर्गे शालेय विद्यार्थी, महिला वाचक श्रीमती. गंगाबाई निन्ने, शशिकला वांगीकर, धानय्या स्वामी,गौरी वांगीकर, रूपाली सट्टे, व बाल वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा शिक्षिका मंजूषा रोकडे मॅडम यांनी घरातील जेष्ठ व्यक्तींना सनमाननीय वागणूक देण्या संबंधी सर्व बालवाचक यांच्याकडून शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संगीता आराध्ये यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल नंदा कुर्ले, समर्थ कुर्ले यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार वाचनालयाचे कार्यवाह जयंत आराध्ये यांनी मानले.
0 Comments