अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने शनिवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान, सकाळी श्रीमंत विजयसिंहराजे भोसले चौक, हन्नूर रस्ता येथील वडार गल्लीत ढोल ताश्यांच्या निनादात गोविंदा पथकांनी मिरवणूकीने येऊन अन्नछत्र मंडळातील दहिहंडी फोडली. गोविंदा पथकांची स्वागत मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी केले. त्यानंतर न्यासाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बांधण्यात आलेली दहीहंडी गोविंदा पथकाने फोडली. दोन वर्षानंतर दहिहंडी उत्सव पार
पडत असल्याने गोविंदा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळाला.
चौकट
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्धेशीय संस्थेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले, सचिव अर्पिताराजे भोसले, महिला भगिनी, भक्तगण
बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments