आई वडिल यांच्या हस्ते भाव अंतरीचे पुस्तकाचे प्रकाशन सोहळा
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- भाव अंतरीचे हे पुस्तक वैचारिक असूनविचाराचे प्रतिबिंब माणसाच्या मनावरती बिंबवणारे ठरणार आहे भाव अंतरीच्या पुस्तकाच्या माध्यमातून विचाराचा जागर करण्याचे काम सागर महाराज काटकर यांनी केले असल्याचे मत ह.भ.प धनंजय महाराज कदम यांनी केले. ते सागर काटकर लिखित 'भाव अंतरीचे' या पुस्तकप्रकाशनप्रसंगी बोलत होते.
शिंदेवाडी तालुका माळशिरस येथील मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी धनंजय महाराज कदम बोलत होते. या वेळी प्रसिद्ध लेखक व व्याख्याते सचिन गोसावी आरोग्य सेविका डॉक्टर मनीषा जाधव विक्रम जगताप दत्ता कदम नवनाथ कोलवडकर रवी कुमार ठावरे उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्या नंतर ह.भ.प सागर महाराज काटकर लिखित भाव अंतरीचे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सागर काटकर यांच्या आई वडिलांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जाधव तर आभार विठ्ठल कदम यांनी मानले.
0 Comments