बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव वजना प्रमाणे करण्यास सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 11, 2025

बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव वजना प्रमाणे करण्यास सुरुवात

 बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव वजना प्रमाणे करण्यास सुरुवात




जनसेवा संघटनेच्या मागणीला यश 

अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे लिलाव हे वजनावर न होता कॅरेट प्रमाणे केले जात होते.
याबाबत महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व सर्व शेतकऱ्यांचे वतीने, विविध मागण्यांचे निवेदन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले होते.यामध्ये
बाजार समितीतील भाजीपाला लिलाव वजनाप्रमाणे  झाला पाहिजे. भाजीपाला वजन करून विकल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि खरेदीदारांचीही फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल. 
तसेच बाजार समितीत भाजीपाला लिलाव करताना वजनकाटा प्रमाणित असणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. 
 तसेच शेतकऱ्यांचे पट्टीमध्ये कमिशन कपात करु नये अशी मागणी करण्यात आली होती.

त्याअनुषंगाने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने दिनांक 8/8/2025 पासुन भाजीपाला लिलाव वजनाप्रमाणे करण्यास सुरुवात केली आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळणार आहे.यासाठी शेतकऱ्यांनी जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते -पाटील यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages