सुरक्षेच्या देवदूतांना राखी बांधून सन्मान–लक्ष्मी-आनंद विद्यालयाचा आगळा-वेगळा उपक्रम
लक्ष्मी-आनंद स्कूल मधील विद्यार्थिनींच्या हातून टेंभुर्णी पोलीसांना राखी – समाज रक्षणकर्त्यांचा सन्मान
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित, लक्ष्मी- आनंद विद्यामंदिर व ज्यु.कॉलेज मधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपले रक्षण करणाऱ्या टेंभुर्णी पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून हा उत्सव साजरा केला.
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्यांस अनुसरून नेहमीच तत्पर असलेले पोलीस खरे बांधव असतात. म्हणूनच याच कृतज्ञतेने विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून हा अनोखा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. यावेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.नारायणजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही कायम आपल्या सोबत आहोत. मुलींनी समाजामध्ये निर्भयपणे वागले पाहीजे, उतुंग यश संपादन केले पाहिजे. अशा आशयाचा ठाम विश्वास या निमित्ताने त्यांनी व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे व टेंभुर्णी सरपंच सुरजा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच संस्थेच्या संचालिका शाहिदा पठाण, प्राचार्य विकास करळे, पीआरओ सागर खुळे, प्रा.युवराज वजाळे,सहशिक्षिका गायत्री शहाणे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
0 Comments