Hot Posts

6/recent/ticker-posts

1.60 कोटी रुपयांचा 692 किलो गांजा जप्त; एक आरोपी अटकेत

 1.60 कोटी रुपयांचा 692 किलो गांजा जप्त; एक आरोपी अटकेत




​बार्शी (कटूसत्य वृत्त):- आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त राबवण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत, पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 कोटी 60 लाख रुपयांचा तब्बल 692.945 किलो गांजा जप्त केला असून, एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई बार्शी तालुक्यात भोयरे गावाजवळ करण्यात आली.
​मिळालेल्या माहितीनुसार, आगळगाव ते बार्शी रोडवर अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बार्शी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना MH 14 EC 4536 क्रमांकाची कार, MH 14 EM 9833 क्रमांकाचा टेम्पो आणि MH 43 V 8947 क्रमांकाचा ट्रक संशयास्पद स्थितीत येत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा करताच, कार आणि ट्रकचे चालक पळून गेले. मात्र, टेम्पोचा चालक अंकुश दशरथ बांगर (रा. भोयरे, ता. बार्शी) पळून जात असताना, पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले.
​पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.
Reactions

Post a Comment

0 Comments