चलो मुंबई! शेवटची लढाई, गुलाल उधळूनच परतायचं
जरांगेंचा सरकारला इशारा
प्रत्येकाने मुंबईला या, राजकीय नेत्याचे ऐकून गावात थांबू नका
बीड (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबईत मोर्चा नेण्याचा निर्धार केलाय. यासाठी बीडमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीच्या ठिकाणी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला चलो मुंबईची घोषणा दिली.
यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय परतायचंच नाही. आरक्षण डोक्यावर घेऊन गुलाल उधळूनच परत यायचं अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली. राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून मुंबईला यायचं थांबू नका असं आवाहनही स्थानिक नेत्यांना जरांगेनी केला.
मंत्री फी भरणार नाही, लेकराबाळांचं शिक्षण होणार नाही. तुमची सत्ता आली म्हणून फुकट नोकऱ्या नाही लागणार. इथं जातीवर संकट आलंय तर तुम्हाला रक्षण करावं लागेल. सरकार मराठ्यांवर संकट आणतेय पण आता मराठा लढणार आहे असंही जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलं.
तुमच्या माझ्या भावनेचा राजकारण्यांनी वापर केला. माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळी आवाहन असतं की आपली ताकद खूप मोठी आहे. फक्त विचारांनी चाललो नाही म्हणून लेकराबाळांचं नुकसान झालं. दुसऱ्याच्या डोक्यानं नाही तर स्वत:च्या डोक्याने चालायचं. बस जालं आथा. ज्यांनी यायचं त्यांनी नाटक शिकवायचं ज्ञान पाजळायचं. उभ्या पिढ्यांचं नुकसानं झालं अशी भावना जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
बीडमध्ये भरउन्हात बसलेल्या मराठा बांधवांना संबोधित करताना जरांगे पाटील म्हणाले की, उन्हातान्हात कुणी बसत नाही आजकाल. गर्व आहे तुमचा मला. तुम्ही उन्हात, पावसात बसता. तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे. मला फोन आले लै ऊन पडलंय. मी म्हणलं एकही मराठ्यांची अस्सल औलाद माघारी जायचं नाही. समाज गर्व वाटावा असं काम करतंय.
बीडचं रूप बघून रातभर सरकारला झोप लागणार नाही. बेजार होतील. नसेल तर मुंबईत गेल्यावर बेजार होतील. चलो मुंबई, २९ ऑगस्टला फाइटच आहे. मला हाणीतेत असं चर्चाय. मला मारणार? तुम्ही आई-बहिणींचं रक्त सांडलंय, तुम्ही फक्त डिवचून दाखवा, काय मराठ्यांची औलाद आहे दाखवतो. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत आंदोलन करायचंय असंही जरांगेनी सांगितलं.
डीजे बंद करायला लावल्यानं संतापले
इथं आल्यावर कळलं की डीजेवर नुसता पखवाजच वाजला. गाणं एकही वाजेना. समाजाला अडचण नाही डीजे नाही वाजू दिला तरी. पोलीस अधिकार्यांना सांगतो की सत्ता येत असते जात असते. मी खुनशी औलादीचा आहे की माझअया डोक्यात एखादा बसला की त्याचा बाजार उठवतो. धमकी नाही, समजून सांगतो. बीड जिल्ह्यात दुसऱ्या कुणाचा डीजे वाजूदे मग सांगतो. डीजे म्हणजे दहशतवाद्यांच्या बंदुका आहेत का? डीजेवर आमचं पोट चालतंय का? बंद तर बंद, पुढचा काळ लक्षात ठेवा, जशास तसं. कुठं कुठं डिजे वाजतो तिथं बारीक लक्ष ठेवायला लागतो. विनाकारण कशाला लोकांना डिवचता., चाललंय ना शांततेत आमचं.
तुम्हाला बढती मिळावी म्हणून लढतोय हा पठ्ठ्या. समजा दुसऱ्याचा असला, तर कुठे ना कुठे होणारच आहे, डीजे वाजेल. गावागावात लोक आहेत आमचे. आयचं देवेंद्र फडणवीस त्याच्या. असले चिल्लर चाळे करायला लावतो व्हय डीवायएसपीला, शांततेत जायचंय, तुम्ही विनाकारण डिवचताय. डीजे काय विषय आहे का, फडणवीसचं ऐकून दंगल घडवायची होती का? पोलीस असला तरी फडणवीसचं ऐकून भानगडीत पडू नका, कधी ना कधी सत्ता बदलेल. तेव्हा आम्ही नाव ध्यानात ठेवू. मला बोलायचं नव्हतं पण जिव्हारी लागलं. फडणवीसचं ऐकून लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही. पोलिसांनी आम्हाला त्रास देण्याऐवजी महादेव मुंडेचे आरोपी धरा. ते दाखवा आम्हाला असं आव्हान जरांगेंनी पोलिसांना दिलं.
मराठा आरक्षण दिलं नाहीत तर काय करणार ते आता मुंबईत येऊनच दाखवू. फडणवीस साहेबांनी डीजे बंद करायला लावले. ही चूक केली. ती करायला नको होती. 29 ऑगस्टला अंतरवालीतून सकाळी निघायचं. समाजाला डाग लागेल असं एकही पाऊल उचलायचं नाही. तुमच्या लेकराला उंचीवर न्यायचंय. मराठ्यांच्या पोरांनी चुकीचं काही करायचं नाही. दगडफेक, जाळपोळ करायची नाही. आजची महत्त्वाची बैठक आहे. बीडमधून मराठ्यांना सांगतो की लेकराबाळांचं वाटोळं झालंय, ते पुढच्या काळात होऊ द्यायचं नाही.
पहिली भूमिका
मुंबईला सर्वांनी शांततेत जायचं. आपल्या शेजारी जरी कुणी तसं वागत असेल तर एकानेही पळायचं नाही. त्याला उचलायचा आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ करणारे आपली पैदास नाही लक्षात ठेवा. सरकारनेच षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा करायला लावतील. आपल्याला खूश कऱण्यासाठी घोषणा देतील आणि त्यांचेच लोक फडणवीस देत नाहीत असं म्हणून दगडं हाणा म्हणतील. ते म्हणू शकतात, त्यामुळे आपल्यापासून पाच फुटावर दगडफेक झाली तरी सरळ चालायचं मुंबईच्या दिशेने.
भूमिका दुसरी
बीडमधल्या प्रत्येक माणसानं घरी रहायचं नाही. मायबापहो शेवटची फाइट आहे. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन गुलाल उधळायचा. मागं फिरायचं नाही. बस झालं आता, कंटाळा आला. उपोषण करून करून फेस पडला. शेवट फाइट आता. सोडायचं नाही मैदान.
तिसरी भूमिका
बीडसह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना फोन लावायचे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, स्थानिक प्रतिनिधी, भावी नेत्यांनाही सांगायचं चला मुंबईला. यातले भावी अर्धे सोडून गेले. ते आपल्या पुढे जाणारेत. पण बाकीच्यांना सांगा फक्त मुंबईला चला.
चौथं महत्त्वाचं काम
डॉक्टर, वकील, गुरुजी, श्रीमंत, नेते यांना सांगा गाड्या बाहेर काढा. जितका कर्मचारी वर्ग आहे त्यांनी सगळ्यांनी मुंबईला चला. लेकरांचे हाल चाललेत.
0 Comments