माझ्या हत्येचा कट, पुरोगामी कार्यकर्ते असुरक्षित- प्रवीण गायकवाड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 14, 2025

माझ्या हत्येचा कट, पुरोगामी कार्यकर्ते असुरक्षित- प्रवीण गायकवाड

माझ्या हत्येचा कट, पुरोगामी कार्यकर्ते असुरक्षित- प्रवीण गायकवाड




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरातील अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काळं फासल्याच्या घटनेनंतर मोठा आरोप केला आहे. शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं टाकलं आणि मला मारण्याचा प्रयत्न केला.

माझ्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला.

सोलापुरातील अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्याची घटना घडल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. प्रवीण गायकवाड यांना काळ फासल्याने विरोधकांनी निषेध व्यक्त केला. या घटनेवर आता प्रवीण गायकवाड यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.

प्रवीण गायकवाड म्हणाले, 'शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं टाकलं. मला मारण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या सत्ताकाळात पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत. कधी पक्ष फोडले जातात, कार्यकर्ते फोडले जातात. मग त्यांच्या मनासारखी गोष्ट करता आली नाही तर सत्य विचारसरणीने आम्ही कार्य करतो. आमचा विचार हा राज्य घटनेला अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता आणि स्वातंत्र्यतेचा आहे'.

'देशात मानवता प्रस्थापित होण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे काम सुरू आहे आणि ते सुरू राहणार आहे. पण काही सामाजिक संघटनेबद्दल गैरसमज पसरवले जातात. मग हिंदुत्वादी विचारसरणीच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मी त्याचा निषेध करणार नाही. पण हे ज्यांनी पण घडवून आणले आहे, त्यांना निश्चितपणे सांगतो की ही शेवटाची सुरुवात आहे, एवढं मी निश्चितपणे सांगतो, असे त्यांनी सांगितले.

'संभाजी ब्रिगेडचा इतिहास सर्वांना माहिती आहे. संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. आम्ही जेव्हा या कार्यक्रमाला पोचतो, तेव्हा पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती. मला असं वाटतंय की जाणीवपूर्वक पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती का, का ठरवून षडयंत्र घडलं होतं का, माझ्या जीविताला धोका होता का? माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळे मी आज जीवंत आहे. मला आनंद वाटतो की, मला चांगलं काम करण्याची संधी असल्यामुळे नवीन जीवनाची संधी मिळाली आहे, असेही गाकवाड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages