मंत्री शिरसाटांच्या 'लक्ष्मी'दर्शनामुळे महायुतीमधील खोकेसंस्कृती उघड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत, असा आरोप राऊतांनी केला होता. संजय राऊतांचा हा दावा आता खरा ठरल्याची चर्चा आहे. कारण संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेचा शेजारी बसलेला व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत ते फोनवर बोलत आहेत आणि या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय शिरसाट याबाबत बोलताना म्हणाले, मी आत्ताच तुमच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे. तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे. माझं बेडरूम आहे. बेडरूममध्ये मी बसलेले बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे. व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही संजय शिरसाट यांनी केलाय.
बॅगेत पैसै असल्याचे व्हीडीओमध्ये दीसत असताना त्यात कपडे असल्याचा हास्यास्पद दावा शिरसाट यांनी केला आहे.यामुळे सामाजीक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनीही शिरसाटांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे.एका हाॅटेलच्या लिलावातील बोलीसंदर्भात शिरसाटांचे चीरंजीवांच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठवली होती.त्याआधी एका महिलेनेहि त्यांच्या चीरंजीवांवर गंभीर आरोप केले होते. ती पैशाची बॅग शिरसाट यांची नसेल तर ती दान करून त्यांनी पुण्य कमवावे असा टोला विधानसभेत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मारला आहे.एकूणच साधनशुचीतेच्या गप्पा मारणार्या भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मात्र या प्रकरणात चांगलीच गोची झाली असून फडणवीस हतबल मुख्यमंत्री असल्याची टिका संजय राऊत यांनी केली आहे.तर पन्नास खोक्यांपैकी एक खोका दीसल्याचा टोला आदीत्य ठाकरे यांनी लगावला आहे.मात्र मंत्र्यांच्या या पैशाने भरलेल्या बॅगेत सर्वसामान्य जनतेच्या जगण्या मरण्याचे प्रश्न मात्र वाहून गेले आहेत.
राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्त्या होत आहेत,पीकविमा कधी मीळेल याकडे बळीराजा डोळे लावून बसला आहे.शेतकर्याच्या मालाला रास्त दर मीळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.बेरोजगारी वाढली असून रोजगाराच्या प्रश्नांनी युवक हताश आहेत.अशा परिस्थीतीत मंत्री मात्र पैशाने भरलेल्या बॅगा उशाला घेऊन झोपत असल्याचे विदारक चीत्र यामुळे जनतेला दीसले.
0 Comments