Hot Posts

6/recent/ticker-posts

बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ

 बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका चुरशीने पार पडल्या असून या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ सोलापूर  बार असोसिएशनच्या हॉलमध्ये रु मंगळवारी उत्साही वातावरणात पार पडला.


सोमवारी झालेल्या निवडणुकीत १३३१ जणांनी मतदान केले होते. त्याची मतमोजणी सायंकाळी बार असोसिएशनच्या हॉलमध्ये झाली. त्यामध्ये विधी एकता पॅनलचे चार उमेदवार व एक अपक्ष उमेदवार विजयी ठरले. यामध्ये अध्यक्षपदासाठी अॅड. बाबासाहेब जाधव यांना ७४१ मते, अॅड. राजेंद्र फताटे यांना ४८६ व अॅड. शिवशंकर घोडके यांना ८१ मध्ये मिळाली. उपाध्यक्षपदासाठी अॅड. रियाज शेख यांना ४८१, नागनाथ बिराजदार यांना ४६३ मते, रविराज सरवदे यांना २३८ मते पडली. सचिवपदासाठी अॅड. बसवराज हिंगमिरे यांना ९९६ तर मायप्पा गौडनवरू यांना ३०६ मते मिळाली. खजिनदारपदासाठी अॅड. अरविंद देडे यांना ९८५ तर संतोषकुमार बाराचारे यांना ३०६ मते पडली. सहसचिवपदासाठी अपक्ष अॅड. मीरा प्रसाद यांना ७४८, प्रियंका गोरंटी यांना ५१६ व नरेंद्रकुमार गावडे यांना ४६ मते पडली. नूतन

अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष अॅड. रियाज शेख, सचिव अॅड. बसवराज हिंगमिरे, खजिनदार अॅड. अरविंद देडे, सहसचिव अॅड. मीरा प्रसाद यांनी पदाची सूत्रे मावळत्या पदाधिकाऱ्यांकडून स्वीकारली. नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. जाधव यांनी बार असोसिएशनच्या भविष्यातील कार्यक्रमांसाठी सहकार्याची हाक दिली. उपस्थितांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त

करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली बार असोसिएशनच्या कार्याला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.


यावेळी मावळते अध्यक्ष व उपाध्यक्ष अॅड. व्ही. पी. शिंदे, सचिव अॅड. मनोजकुमार पामूल, खजिनदार अॅड. विनयकुमार कटारे व सहसचिवा अॅड. निदा सैफन हे उपस्थित होते. या पदग्रहण

समारंभात वकिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.


Reactions

Post a Comment

0 Comments