सपाटे यांना मराठा समाजातून बहिष्कृत करा
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी प्रशालेत मनमानी कारभार करून मनोहर सपाटे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सपाटे हे मराठा समाजासाठी कलंक असल्याचा आरोप करुन अशा नी, चारित्र्यहीन माणसाला समाजातून हे. बहिष्कृत केले पाहिजे, अशा संतप्त भावना मराठा समाज वं बांधवांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.
माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरुध्द महिलेचा विनयभंग केल्याबद्दल पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. फडकुले सभागृहात मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत सपाटे यांनी आतापर्यंत केलेले कथित गैरव्यवहार, अनेकांची केलेली फसवणूक, दिलेला मानसिक त्रास व दुष्कृत्यांचा पाढाच वाचण्यात आला.
शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरड यांनी मनोर सपाटे यांच्यासारख्या चारित्र्यहीन माणसाला समाजातून बहिष्कृत करण्याची गरज असून त्या माणसाविरुध्द शेवटपर्यंत लढणार असल्याचे सांगितले. सपाटे यांच्या कृत्याचा निषेध करून सकल मराठा समाजाच समन्वयक माउली पवार यांनी समाज जो निर्णय घेईल तो मान्य करु असे सांगितले.
यावेळी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी, मराठा सेवा मंडळ या संस्थेसाठी तत्कालीन समाज धुरिणांनी पै पै गोळा करून जागा घेतल्याचे सांगून या संस्थेत सपाटे यांनी मनमानी कारभार करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.
समाजाच्या सभागृहास असलेले समाजभूषण बाबासाहेब गावडे यांचे नाव बदलून स्वतःचे नाव लावणाऱ्या सपाटे यांना जेलमध्ये घालण्याची गरज असल्याची भावना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील रसाळे यांनी व्यक्त केली.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले, सपाटे यांच्याविरुध्द पोलिसांनी दुष्कर्म ऐवजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अशा व्यक्तीला संस्थेतून बाहेर काढण्याची गरज आहे. तसेच आतापर्यंत अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मनोहर सपाटे यांनी मराठा सेवा मंडळाच्या अध्यक्षपदावरून स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी केली. सपाटे यांना संस्थेवरून काढून टाकण्यासाठी कायदेशीर लढा लढण्याची गरज असल्याचे माजी नगरसेवक अनंत जाधव म्हणाले. शिवसेना नेते प्रताप चव्हाण यांनी सपाटे यांच्यावर समाज बांधवांनी बहिष्कार घालावा, अशी मागणी केली. प्रा. अनिल बारबोले यांनी शिवाजी प्रशालेत सपाटे यांचा मनमानी कारभार कसा चालतो हे सांगितले. यावेळी हरिदास
जाधव, विष्णू आयगोळे, शेखर फंड, श्रीकांत घाडगे, महेश पवार, राज कुलकर्णी, किरण पवार, जितेंद्र इटाई यांनीही मनोहर सपाटे यांच्याबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. या बैठकीस श्रीकांत डांगे, चंद्रकांत वानकर, भाऊसाहेब रोडगे, लहू गायकवाड, बाळासाहेब पुणेकर, सूर्यकांत पाटील, योगेश पवार, निशांत
सावळे, विश्वजीत चुंगे, गणेश डोंगरे, अंबादास शेळके, हृषीकेश शिंदे, तुकाराम मस्के, सुभाष पवार, रवी मोहिते, प्रशांत पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments