Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा

 लोकमंगल कृषी महाविद्यालयात महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा




 वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान  संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित, लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक १ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांची जयंती अर्थात कृषी दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे कृषी अर्थशास्त्र विभागाचे विभाप्रमुख  प्रा. नवनाथ गोसावी  यांनी भूषविले. कृषी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मौजे. आळगे तालुका. अक्कलकोट, जिल्हा. सोलापूर येथील प्रगतशील शेतकरी  संगप्पा हत्तुरे हे लाभले होते. यानंतर कार्यक्रम अध्यक्षांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा रोप भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.  संगाप्पा हत्तुरे पाटील यांच्या हत्तुरे ऍग्रो सायन्स शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत देशी गाईपासून सेंद्रिय खते, जीवामृत आणि तसेच पशुंकरिता पशु खाद्य निर्मिती केली जाते. उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना संगप्पा हत्तुरे यांनी वसंतरावजी नाईक साहेबांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला आणि त्यांच्याच विचाराला अनुसरून शेतकरी उत्पादक  कंपनीमार्फत सुरू असणाऱ्या विविध बाबींविषयी सखोल माहिती दिली. यावेळी त्यांनी कंपनीमार्फत तयार केले जाणाऱ्या  सदाबहार जातीच्या पेरू रोपांच्या लागवड पद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली. या नंतर अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रा. नवनाथ गोसावी  यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नाईक साहेबांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय कार्याविषयी  विस्तृत मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदरील कार्यक्रमास हत्तुरे ऍग्रो सायन्स शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक  दयानंद पाटील, सुरेश कोळी,  विनायक जमादार  आणि प्रगतशील शेतकरी  अंबादास बिराजदार (सेंद्रीय शेती अभ्यासक), मासीद घुटाळे, प्रकाश पाटील  यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन व संपन्नतेसाठी कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. सुजाता चौगुले आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कृषी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक - प्राध्यापिका वृंद आणि विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी कु.गणेश केदार याने केले. 

Reactions

Post a Comment

0 Comments