लक्ष्मी आनंद विद्यामंदिर व ज्यु. कॉलेजमध्ये कृषी दिन मोठ्या उत्साहात संपन्न
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री माऊली शिक्षण प्रसारक समाजसेवा मंडळ संचलित, लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्यु. कॉलेज टेंभुर्णी येथे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने सदर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांना ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रशालेच्या वतीने महाराष्ट्र कृषी दिन, डॉक्टर्स डे/ चार्टर्ड अकौंटट असे विविध दिवा साजरे करण्यात आले.
यावेळी बोलताना मा. संजय पाटील साहेब म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अनेक विविध पदांवरती कृषी कार्यरत असणारे अधिकारी वर्ग हे मुख्यतः कृषी विज्ञान या शाखेतून आपल्याला आलेले पाहायला मिळतील. तसेच याप्रसंगी क्रॉप सायन्सचे विद्यार्थी २०० गुण मिळवून राज्यात प्रथम येतात याविषयी त्यांनी प्रशालेचे व ज्यु. कॉलेजचे कौतुकही केले.
त्याबरोबरच विकास वाघे यांनी सीए होण्यासाठी आवश्यक बाबी तसेच अभ्यासपद्धती व शासकीय जागा याबाबग मार्गदर्शन केले. डॉ. वाघावकर यांनी देखील विद्यार्थ्यांना आरोग्य व सकस आहार याबाबत योग्य माहिती दिली. फास्टफूड व बाहेरचे अन्नाने होणारे परिणाम याबाबतही सांगितले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी शै.संचालिका शहिदा पठाण, प्राचार्य विकास करळे, कृषी अधिकारी, संजय पाटील, राहूल मोरे साहेब, डॉ. सतीश वाघावकर, डॉ. संजय दोशी, डॉ. संदीप काळे, डॉ. मस्तुद, डॉ. देवडकर व इतर अनेक मान्यवर, पालक शिक्षक-शिक्षिकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments