अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवात दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या अभिनेते आदेश बांदेकर यांच्या 'खेळ मांडियेला' या कार्यक्रमाला महिलांची झुंबड उडाली.
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अभिनेते आदेश बांदेकर प्रस्तुत 'खेळ मांडियेला' हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपनिबंधक सहकारी संस्था. सोलापूरच्या डॉ. प्रगती बागल, मनोरमा मल्टिस्टेट सोसायटीच्या. चेअरमन शोभा मोरे, सोलापूरच्या डॉ. रोहिणी देशपांडे, मल्लमा पसारे, डॉ. आसावरी पेडगावकर, किशोरी शहां, न्यासाच्या विश्वस्त व हिरकणी संस्थेच्या संस्थापिका अलकाताई भोसले, सचिवा अर्पिताराजे भोसले, अनिता खोबरे, रत्नमाला मचाले, सरोजिनी मोरे, तृप्ती पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अभिनेते बांदेकर यांनी महिलांशी संवाद साधत त्यांना बोलते केले. महिलांसाठी विविध खेळ सादर करण्यात आले. विजेत्या महिलांना मानाच्या ५ पैठणी, २५० घड्याळ पारितोषिक म्हणून देण्यात आले. यावेळी कलाकार सोहम बांदेकर, रशीद शेख, प्रमोद शेंडगे, नंदू डेव्हीज, अश्विनी कुर्ते, सुनील कुर्ते, कुमार साळुंके, मल्हार, रोहन `या कलाकारांचा सत्कार न्यासाच्यावतीने करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव श्यामराव मोरे यांनी स्वागत करुन आभार मानले.
अन्नछत्र मंडळ पवित्र ठिकाण
श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्यामुळे सांस्कृतिक वारसा लाभला आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे सुंदर व पवित्र ठिकाण असून येथे सेवा करण्याची संधी
मला लाभत आहे.
अभिनेते आदेश बांदेकर
0 Comments