स्वेरी ज्ञानसंस्कृतीचा पॅटर्न आता एसव्हीआयटीमध्ये राबविणार
एसव्हीआयटीमध्ये नवे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूरच्या स्वेरी ज्ञानसंस्कृतीचा पॅटर्न आता उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एसव्हीआयटी) राबविण्यात येत आहे. सन 2025 - 26 या शैक्षणिक वर्षापासून एसव्हीआयटीमध्ये विविध सहा पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती स्वेरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार दि. 25 जुलै 2025 रोजी सोलापुरातील एसव्हीआयटी येथे स्वेरी पंढरपूरच्या शैक्षणिक परंपरेचा सोलापूरमध्ये औपचारिक प्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत
स्वेरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली.
पंढरपुरातील गोपाळपूरच्या माळरानावर 1998 साली सुरू झालेल्या स्वेरी (श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट) या संस्थेने ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली केली. संस्थापक अध्यक्ष डॉ. बी.पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली "पंढरपूर पॅटर्न" नावाचा एक अनोखा शिक्षणक्रम साकार झाला आहे. जिथे गुणवत्ता, शिस्त आणि संस्कार एकत्र नांदतात. आदर आणि शिस्त ही स्वेरीची ज्ञान संस्कृती आहे. आता या पॅटर्नचा विस्तार सोलापूर जिल्ह्यातील एसव्हीआयटीच्या माध्यमातून होत आहे. सन 2025 - 26 या शैक्षणिक वर्षापासूनच एसव्हीआयटी मध्ये पदवी अभ्यासक्रमाची नवीन सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सोलापुरातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबईला न जाता दर्जेदार शिक्षणाची संधी इथे मिळणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून एसव्हीआयटीमध्ये इंजिनिअरिंग शाखेत कॉम्प्युटर सायन्स (120 जागा), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (प्रत्येकी 60 जागा), तर व्यवस्थापन शाखेत एमबीए, एमसीए (प्रत्येकी 60 जागा) उपलब्ध आहेत.
या संस्थेत आधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक, इनक्युबेशन मार्गदर्शन आणि स्टार्टअपसाठी विशेष सुविधाही उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी एसव्हीआयटी सोलापूरशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले आहे.
स्वेरीच्या व्यवस्थापनाने एसव्हीआयटीचे नियंत्रण घेतल्यानंतर गेल्या तीन वर्षात डिप्लोमा अभ्यासक्रमाद्वारे संपूर्ण प्रवेश व उत्कृष्ट निकाल असे शैक्षणिक रेकॉर्ड निर्माण केले आहे. डिप्लोमा सोबत येथे आयटीआय सुद्धा कार्यरत आहे. मोबाईल मुक्त व अभ्यासाभिमूक शिक्षण संस्कृति, अत्याधुनिक संगणक व तांत्रिक प्रयोगशाळा, इंग्रजी संभाषण व व्यक्तिमत्व विकासासाठी उत्तम उपक्रम, स्वच्छ व सुरक्षित हॉस्टेल तसेच स्वेरीच्या सहकार्यातून प्रशिक्षण व नोकरीच्या संधी मिळवून देण्यात येत आहेत. एसव्हीआयटीचे प्राचार्य डॉ. यु. एस. सुतार यांचे नेतृत्व आणि प्रा. कीर्ती भोसले यांचे सक्षम कॅम्पस व्यवस्थापन या महाविद्यालयास लाभले आहे.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. यु. एस. सुतार यांनी स्वागत केले. यावेळी विश्वस्त मंडळातील उपाध्यक्ष एच. एम. बागल, सचिव अशोक भोसले, विश्वस्त बी. डी. रोंगे, संयुक्त सचिव सूरज रोंगे, देशपांडे, मुजावर व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
0 Comments