धानय्या मठपती रचित श्री अणिवीरभद्रेश्वर चरित्रामृत ग्रंथाचे प्रकाशन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरचे कन्नड साहित्यिक वेदमूर्ती धानय्या मठपती रचित श्री अणिवीरभद्रेश्वर चरित्रामृत या ग्रंथाचे प्रकाशन कोरवार (कर्नाटक) येथे मंगलमय वातावरणात करण्यात आले. प्रमुख अतिथी वेदमूर्ती धनंजय स्वामीजी, माजी खासदार बसवराज पाटील, माजी खासदार आय. बी. हिरेमठ, तहसीलदार पृथ्वीराज पाटील, कलबुर्गी कन्नड साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार तेगलतिप्पी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रथम या ग्रंथाची अंबारीवरुन मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत सुवासिनींनी कुंभ, कलश आणि आरती घेऊन सहभाग घेतला होता. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे हे ग्रंथ भामिनी शटपदी या पारंपरिक काव्यछंदात रचले आहे. मठपती यांनी तब्बल तीन वर्षे अथक परिश्रम घेत हे साहित्य पूर्ण केले आहेत. या ग्रंथात श्री अणिवीरभद्रेश्वर देवांचे जीवनचरित्र, भक्तिपरंपरा आणि तत्त्वज्ञान याचे रसपूर्ण वर्णन केले आहे. मान्यवरांनी मठपती यांच्या साहित्यिक योगदानाचे विशेष कौतुक केले. परंपरा, भक्ती आणि साहित्याचा सुरेख संगम असलेल्या या ग्रंथामुळे आध्यात्मिक क्षेत्रात भर पडली आहे.मुद्देबिहाळ येथील सोमशेखर अणेप्पनवरु यांनी या ग्रंथाच्या हजार प्रती तसेच सोलापूरचे सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी यांनी वीरभद्रेश्वर अष्टोत्तर शतनामावलीचे मराठी आवृत्तीचे एक हजार प्रती ग्रंथ मंदिर समितीस मोफत देऊन दातृत्व भावना दाखविली.
0 Comments