Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा दूध संघावर केलेले सर्व आरोप चुकीचे, खोडसाळपणाचे व राजकीय हेतूने प्रेरित- चेअरमन रणजितसिंह शिंदे

 जिल्हा दूध संघावर केलेले सर्व आरोप चुकीचे, खोडसाळपणाचे व राजकीय हेतूने प्रेरित- चेअरमन रणजितसिंह शिंदे





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा दूध संघावर सध्या जे विरोधकांकडून आरोप केले जात आहेत ते सर्व चुकीचे व पूर्णपणे खोडसाळपणाचे आहेत.हे आरोप सर्वस्वी खोटे,अर्धवट माहितीच्या आधारे,अज्ञानातून व वस्तुस्थिती जाणून न घेता पूर्णतः राजकीय हेतूने प्रेरित आहेत.विद्यमान संचालक मंडळाने 2022-2023 पासून दूध संघाचा कारभार करताना मार्केटमधील सर्व परिस्थितीचा विचार करून दूध संघाचा तोटा कसा कमी करायचा ?दूध संस्थांची देणी कशी द्यायची ?, संघावरील पूर्वीचे जे 2016-17 पासून असलेले कर्ज कसे कमी करायचे ? अतिरिक्त कर्मचाऱ्यांची संख्या कशी कमी करायची ? खाजगी दूध संघाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी काय करायचे? या बाबींवर आम्ही सातत्याने भर दिला आहे.दूध संघाला पुन्हा गतवैभव व ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी संघाचे हस्तांतरण एनडीडीबी कडे अर्थात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे यांच्याकडे करायचे अशा विधायक भूमिकेतून सर्व संचालक मंडळ कार्यरत आहे.ही वस्तुस्थिती असताना अभ्यास न करता, कसलीही माहिती जाणून न घेता बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विरोधकांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.

पुढे अधिक माहिती देताना चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले की,विद्यमान संचालकचा कारभार 2022- 2023 पासून सुरू झाला असून इथून पुढे संचालक मंडळाने संघाच्या हिताचाच विचार करून योग्य ते निर्णय घेतले आहेत.तोटा हा पूर्वीच्या संचालक मंडळाचा काळातील आहे.सध्या दूध व्यवसायात खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे जिल्हा संघाचे दूध संकलन कमी झाले आहे.लाईट बिल, कर्मचारी खर्च ज्यादा असल्याने संचालक मंडळाने ऑगस्ट 24 मध्ये दूध प्रकल्प केगाव वगळता सर्व जिल्ह्यातील  दूध शीतकरण केंद्रे बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता त्यामुळे प्रतिमहीना 20 लाख रुपयांची बचत होऊ लागली.आज अखेर जिल्हा दूध संघाकडे विविध बँकांचे 40 कोटी 70 लाख रुपये कर्ज आहे.परंतु यातील काही देणी देखील आम्ही दिलेली आहेत.त्याचाच भाग म्हणजे 31 मार्च 23 अखेर दूध उत्पादक संस्थांचे 7 कोटी 52 लाख रुपये देणे होते यापैकी संचालक मंडळाने 5 कोटी 27 लाख रुपये देणे दिले असून फक्त सहा कोटी रुपये कर्ज घेतलेले आहे, उर्वरित कर्ज हे पूर्वीचे संचालक मंडळ व प्रशासकीय मंडळ कालावधीतील आहे.अत्यंत काटकसरीने व व्यापारी पद्धतीने कारभार करून संघाचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

कलम 88 अन्वये झालेल्या कारवाईवर महानिबंधक सहकारी संस्था दुग्ध महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे स्थगिती अर्ज दाखल करुन व 21 जून 24 रोजी स्थगिती घेतली. सदर स्थगितीवर संघाने वकिलामार्फत युक्तिवाद करून झाल्यानंतर सहनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी संबंधित युक्तिवाद मंजूर करून कलम 88 अन्वये झालेली कारवाई रद्द करून संचालक मंडळास फेब्रुवारी 25 आदेशाने दोष मुक्त केले.

कलम 78 अन्वये झालेल्या कार्यवाहीवर अपीलावर माननीय सहाय्यक निबंध सहकारी संस्था दुग्ध महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती.सदर याचीकेवर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचेकडे युक्तिवाद झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी संबंधित याचिकेवर माननीय सहनिबंधक सहकारी संस्था दुग्ध महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार 11 एप्रिल 2025 रोजी प्रशासकीय मंडळाची नियुक्ती रद्द करून पूर्ववत संघाचे विद्यमान संचालक मंडळास कारभार करण्याचे आदेश दिलेले आहेत. 

-चौकट - 
चेअरमन रणजितसिंह शिंदे यांचे दूध संघासाठी वैयक्तिक योगदान - संचालक मंडळाने अकार्यक्षम व कामचुकार व अतिरिक्त कर्मचारी कमी करून आर्थिक तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी संघासाठी केवड येथील बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजच्या कारखान्यातर्फे संघास बल्क कुलर तीन नग खरेदीसाठी 33 लाख रुपये बिनव्याजी दिलेले आहेत.कारखान्याचे कुशल व अनुभवी 3 अधिकारी कारखान्यातर्फे पगार देऊन संघाकडे वितरण व संगणक कार्यप्रणाली व्यवस्था पाहण्यासाठी प्रतिनियुक्तीवर दिलेले आहेत.विरोधक केवळ स्टंटबाजी व प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे व अभ्यास न करता आरोप करीत आहेत.जिल्हा दूध संघ 2016 -2017 या आर्थिक सालापासून तोट्यात आहे याला विद्यमान संचालक मंडळ जबाबदार नाही.आमच्यावर आरोप करणाऱ्या  लोकप्रतिनिधींनी स्वतः चालवित असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात एनसीडीसीकडून 347 कोटी आणून त्याचे काय केले ? याचे उत्तर त्यांनी सभासद शेतकरी व जनतेला अद्यापही दिलेले नाही.त्याचे उत्तर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार अभिजित पाटील यांनी द्यावे अशी मागणी जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे यांच्यासह इतर संचालकांनी केली आहे.

फोटो ओळी 1) चेअरमन रणजितसिंह शिंदे 

2) संचालक शंभूराजे मोरे.

Reactions

Post a Comment

0 Comments