Hot Posts

6/recent/ticker-posts

कुक्कुटपालन व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे

कुक्कुटपालन व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे




      - पशुधन विकास अधिकारी डॉ. बोधनकर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांसाठी शेती पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुट पालन हा खूप चांगला व्यवसाय आहे. हा व्यवसाय रोख रक्कम देणारा असल्याने याचा शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या खूप फायदा होतो. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकानुसार या व्यवसायातून प्राणीजन्य पदार्थ, अंडी व मांस हे मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. तरी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीत आणून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्नेहंका बोधनकर यांनी केले.
     जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे कुक्कुटपालन प्रशिक्षणाची तुकडी क्र. २ चे पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहंका बोधनकर यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे, त्याप्रसंगीत या मार्गदर्शन करत होत्या.

  प्रशिक्षणार्थीमधून. सौ. वनिता रणे, रा. ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा व श्री. सुरज कुचेकर, रा. सावळेश्वर ता. मोहोळ यांनी सदर प्रशिक्षण हे भविष्यात स्वयंरोजगार व लघु उद्योग उभारणीसाठी पूरक माहीती व ज्ञान मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. सदर प्रशिक्षणाची तुकडी दि. ०७ जुलै २०२५ ते ११ जुलै २०२५ या कालावधीत संपन्न झालेली असून सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. जमादार यांनी परिश्रम घेतलेले आहेत. तरी पुढील तुकडीस जिल्ह्यातील पशुपालकांनी तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. पी. माने यांनी केले. 

Reactions

Post a Comment

0 Comments