तालुकास्तरीय उडीद उत्पादन स्पर्धेत संगिता काशीद प्रथम तर गणेश काशीद तृतीय
माढा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासन व तालुका कृषी विभागाच्या वतीने घेतलेल्या तालुकास्तरीय खरीप पीक स्पर्धेत उडीद उत्पादन पिकामध्ये अंजनगाव उमाटे ता.माढा येथील शेतकरी संगीता गणेश काशीद यांनी एका हेक्टरमध्ये 17.50 क्विंटल उत्पादन घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक तर याच स्पर्धेत शेतकरी गणेश गोरख काशीद यांनी हेक्टरी 14.65 क्विंटल उडीदाचे उत्पादन घेऊन तालुक्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विशेष बाब म्हणजे हे दोघे पती-पत्नी आहेत.या दोघांना अनुक्रमे 5000 व 2000 रुपयांचे बक्षीस व प्रमाणपत्र देऊन कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे व तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हे बक्षीस व सन्मान काशीद दाम्पत्यांचे सुपुत्र प्रगतशील शेतकरी जयंत काशीद यांनी कुर्डूवाडी येथील पंचायत समितीच्या कै.विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सभागृहात समारंभपूर्वक स्वीकारला.उडीद हे खरीप हंगामातील कमी कालावधीत उत्पादन देणारे पीक आहे त्यामुळे काशीद दाम्पत्याने भरपूर मशागत,योग्य प्रमाणात खतांचा वापर, गरजेनुसार औषधांची फवारणी व खुरपणी केली होती.जमीन सुपीक व काळी कसदार असल्याने हे विक्रमी उत्पादन घेऊन तालुक्यात एक चांगला आदर्श प्रस्थापित केला आहे. गणेश काशीद हे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक व माढेश्वरी अर्बन बँकेचे संचालक आहेत. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे,माजी सभापती विक्रमसिंह शिंदे, माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन अशोकशेठ लुणावत,मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, वरिष्ठ अधिकारी निलेश कुलकर्णी, हभप हिरालाल पोतदार यांच्यासह अनेकांनी केले आहे.
यावेळी कृषी अधिकारी शंकर मिरगणे,मंडल कृषी अधिकारी हनुमंत बोराटे,उपकृषी अधिकारी बलराज गोसावी, कृष्णा मस्तुद,आत्माचे आनंद झिने,महादेव उमाटे,संदीप उमाटे,हिरालाल पोतदार यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments