अनगर येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा
अनगर (कटूसत्य वृत्त):- येथील कै. शंकराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत ढोले हे होते, तर यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक सत्यवान कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व पटवून देत लोकसंख्यावाढीचे सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय परिणाम समजावून सांगितले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य महादेव चोपडे पर्यवेक्षक माधव खरात, पांडुरंग शिंदे, दाजी गुंड, सत्यवान दाढे, सोमनाथ ढोले,बापूराव घुले, अर्चना गुंड, गणेश उघडे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि उपस्थित सर्वांनी या सामाजिक विषयावर सजगतेने विचार करण्याचे वचन दिले.
0 Comments