Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज येथे रत्नाई चषक राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन

 अकलूज येथे रत्नाई चषक राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन



अकलूज (कटूसत्य वृत्त):- प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या १०१ व्या जयंती निमित्त दि. २० जुलै रोजी रत्नाई चषक राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी दिली.
      सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृतीभवन,शंकरनगर (महर्षी हाॅल) येथे सदरच्या स्पर्धा होणार आहेत.मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाने कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या ही वर्षी भव्य प्रमाणात स्पर्धेचे  आयोजन केले आहे.                                      
    सदरची स्पर्धा सोलापूर जिल्हा चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने होत असुन  स्पर्धेत १२ वर्षे , १७ वर्षे  व खुला गट अशा तीन गटांसाठी होत आहेत. प्रत्येक  गटासाठी स्वतंत्र परितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत ६०  रोख रकमेची बक्षिसे, ६० सन्मानचिन्हे , ६० पदके असून प्रत्येक गटात २० पेक्षा अधिक बक्षिसे आहेत. माळशिरस तालुक्यातील खेळाडूंसाठी  तालुक्याचा स्वतंत्र गट तयार केला असून या गटासाठीही स्वतंत्र बक्षिसे आहेत.ही स्पर्धा स्विझलिंग पद्धतीने खेळवली जाणार असून दि. १८ जुलै रोजी सायं. ६ वाजेपर्यंतच ऑनलाईन स्पर्धा नोंदणी स्विकारली जाणार आहे. या वेळी
उपाध्यक्ष पोपटराव भोसले- पाटील, सचिव बिभिशन जाधव, स्पर्धा प्रमुख अभिजित बावळे, डाॅ प्रवीण ढवळे, मल्हारी घुले उपस्थित होते.
स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी बारा वर्षे वयोगटाकरिता राजन चिंचकर ८९८३०३७०५५, सतरा वर्षे वयोगटाकरिता जयप्रकाश जगताप ९०९६०५२१९७ व खुल्या गटासाठी रावसाहेब मगर ९१४५७८४५८७ या क्रमांकावर संपर्क करून सहभाग नोंदविण्याचे आवाहनही सचिव बिभीषण जाधव यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments