अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून पुरग्रस्त, भूकंप ग्रस्तांना मदत करताना जनमेजयराजे भोसले यांची सहवेदना जाणवली- शिवरत्न शेटे
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदान करतानाच पुरग्रस्त, भुंकुप ग्रस्तांना मदत करताना जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांची सहवेदना जाणवली. ज्याला संवेदना असते तो महामानव असतो. दररोज ३०० निराधारांना समर्थ प्रसादाच्या माध्यमातून घरपोच जेवण पोहोचविणारा तुम्ही संत आहात. यामुळे हा सत्कार केला जात आहे असे मनोगत शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी केले.
श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था,अक्कलकोट व सकल मराठा समाज, अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा नागरी सत्कार व मानपत्र प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. रविवारी १३ जुलै रोजी दुपारी अक्कलकोट येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.शरदराव फुटाणे हे होते.
यावेळी व्यासपीठावर, शिवव्याख्याते शिवरत्न शेटे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, सचिव शामराव मोरे, अन्नछत्र मंडळ उपाध्यक्ष व लायन्स क्लबचे अध्यक्ष अभय खोबरे, भाऊ कापसे, राजीव माने, दिलीप सिद्धे, लाला राठोड, सुधाकर गोंडाळ, संतोष फुटाणे-जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
स्वागत व प्रास्तविक माजी अध्यक्ष राजीव माने यांनी केले. बाळासाहेब मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले एखाद्या योग्य माणसाला पुरस्कार दिला की त्या संस्थेची उंची वाढते.
यावेळी फत्तेसिंह संस्थेचे उपाध्यक्ष अमर शिंदे, संचालक बाळासाहेब मोरे, तानाजी चव्हाण, स्वामीराव पाटील, शिवाजीराव पाटील, राम गायकवाड, अविनाश मडिखांबे, तम्मा शेळके, सोपान निकते, मुख्याध्यापक शरद जंगाले, सुभाष गडसिंग, मनसे तालुकाध्यक्ष मल्लिनाथ पाटील, रवी कदम, विठ्ठल मोरे, अरूण जाधव, प्रा.प्रकाश सुरवसे, प्रभाकर मजगे, सायबण्णा जाधव, बाबासाहेब निंबाळकर, दत्तात्रय पाटील, विक्रांत गोडसे, शिवराज स्वामी, रवी कदम, विठ्ठल चव्हाण, विलास गव्हाणे, राजेश पडवळकर, ज्योतीबा नवले, ताराबाई हांडे, नितीन मोरे, अरविंद शिंदे, संजय सोनटक्के, महादेव माडेकर, प्रदीप जगताप आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार संतोष जाधव-फुटाणे यांनी मानले.
चौकट २)
कोण काय म्हणाले-
१)बाळासाहेब मोरे- अन्नछत्र मंडळामुळे आज अक्कलकोटचे नांव देशाच्या पटलावर आले आहे.
२) शिवरत्न शेटे शिवव्याख्याते- जनमेजयराजे भोसले यांनी अवघा महाराष्ट्र पालखी परिक्रमेतुन पिंजुन काढला परिणामी आज लाखोंची गर्दी अक्कलकोट मध्ये दिसत आहे. अक्कलकोट मध्ये जन्म होणे महापुण्याई आहे. जनमेजयराजे हे नांव कोटीतील एक नांव आहे. त्याचा अर्थ (बाँर्न टु वीन) विजयासाठी जन्माला आलेला. पुरग्रस्त, भुंकुप ग्रस्तांना मदत करताना सहवेदना जाणवली. ज्याला संवेदना असते तो महामानव असतो. कोविड काळात रूग्णालय सुरु केले. तुमचे सामाज्र सांभाळुन कांकणभर साम्राज्य वाढविणारा अमोलराजे सारखा पुत्र तुम्हाला लाभला हे तुमचे भाग्य आहे. हिरकणी संस्थेच्या माध्यमातून तुमच्या खांद्याला खांदा लावुन सामाजिक कार्य करणाऱ्या अर्धिंगी अलकाताई तुम्हाला भेटले हे तुमचे भाग्य आहे. जनमेजयराजे तुम्ही ३०० निराधारांना जे दररोज दोनवेळचे डबे पुरविताय हे तुम्हाला संत पदाला घेऊन जाते.
चौकट १)
अक्कलकोटच्या इतिहासात अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्यामुळे अक्कलकोटचे नाव आता सातासमुद्रापलीकडे पोहोचले असून, अलीकडेच त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ही बाब अक्कलकोटकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असून, यामुळेच जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
चौकट २)
महाराष्ट्र प्रदेश संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे आले असताना त्यांच्या वर शाईफेक व धक्काबुकी ,मारहाण झाली. याचा निषेध बाळासाहेब मोरे यांनी केला.
चौकट ३)
अध्यक्षीय समारोप अँड सर्जेराव जाधव - समाजसेवेचा ध्यास घेतलेले जी संस्था लावली , वाढविली व जगभर पोहोचवली ही एकमेव व्यक्ती आहे. जनमेजयराजे परीस आहेत.त्यांच्या सानिध्यात आलेल्यांचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहत नाही.
चौकट ४)
सत्कारमुर्ती जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले- फत्तेसिंह संस्था व सर्जेराव जाधव चँरिटेबल ट्रस्ट यालाही मदत करू. मराठा मंदिर श्री शहाजी प्रशाला वर्गखोल्या नुतनीकरणासाठी मदत केली आहे. हरित अक्कलकोट साठी प्रयत्न करत असतो. भव्य महाप्रसाद गृह स्वामींच्या कृपेने साकारात आहे. सर्व पदाधिकारी यांची मोलाची साथ असते.
चौकट ५)
पुणेरी पगडी, चांदीची तलवार, मानपत्र, शाल, हार गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
चौकट ६)
गुणीजन पुरस्कार- दहावी मुलीत प्रथम आल्याबद्दल शेजल जाधव फुटाणे व एम पी एस सी त निवड झाल्याबद्दल वैष्णवी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments