अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुपांतरीत होणार असून या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाने विशेष बाब म्हणून १०८ कोटींच्या आराखड्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. हे काम सध्या प्रगतिपथावर आहे.
अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे प्रसिद्ध मंदिर असल्याने अक्कलकोटला लाखो स्वामी भक्तांची वर्दळ असते. तालुक्यात सर्वत्र चारही बाजूंनी पसरलेले राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर वसलेला बहुभाषिक तालुका, शेतीच्या बाजारपेठेसाठी सतत होत असलेली लगबग या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने धार्मिक व ऐतिहासिक शहर म्हणून अक्कलकोटची ओळख आहे.
या वर्दळीतून आणि सततच्या धावपळीतून अनेक अपघात होत असतात. तालुकावासियांना ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत, अशी सतत तक्रार होत असते. अक्कलकोटमध्ये असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा देण्यासाठी अक्कलकोटमधील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे.
चौकट
तालुक्याचा रुग्णसुविधेचा प्रश्न मिटणार
अत्याधुनिक रुग्णसेवेसाठी अक्कलकोटवासीयांना सोलापूरशिवाय पर्याय नव्हता. तीर्थक्षेत्रामुळे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या सर्वांना एका छताखाली सर्व वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आ. सचिन कल्याणशेट्टींनी प्रयत्नपूर्वक
0 Comments