Hot Posts

6/recent/ticker-posts

करमाळा : १०८ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत जाहीर

 करमाळा : १०८ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत जाहीर

करमाळा (कटूसत्य वृत्त):-  करमाळा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत येथील पंचायत समिती हॉलमध्ये तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जाती अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण तसेच सर्वसाधारण पुरुष व महिला अशी बिंदू नामावली निश्चित करण्यात आली. २०२५ ते २०१९ या कालावधी करिता सार्वत्रिक निवडणूक होऊन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाकरिता सदरील आरक्षण लागू राहणार आहे.


सरपंच पदाचे आरक्षण याप्रमाणे असेल. अनुसूचित जमातीसाठी पूनवर, अनुसूचित जमाती (महिला): निरंक, अनुसूचित जाती : पाथर्डी, घारगाव, सौदे, दहिगाव, शेलगाव वा., मलवडी. अनुसूचित जाती (महिला) फिसरे, वाशिंबे, देवळाली/खडकेवाडी, साडे, उमरड, शेलगाव क., नागरिकांचा मागास प्रवर्ग : केडगाव, भाळवणी, लव्हे, वरकुटे, कुंभारगाव/ घरतवाडी, सातोली, गुलमरवाडी/भागतवाडी, गोयेगाव, रावगाव, चिखलठाण, देलवडी, पोटेगाव, गौंडरे, जेऊरवाडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : केत्तूर, नेरले, कोंढेज, वडशिवणे, बिटरगाव श्री., पिंपळवाडी, कारंजे / भालेवाडी, झरे, निंभोरे, जातेगाव, कोंडारचिचोली, आळजापूर, कोळगाव, गुळसडी, पोफळज. सर्वसाधारण : वीट, बाळेवाडी, हिंगणी, ढोकरी, राजुरी, रिटेवाडी, वडाचीवाडी/दिलमेश्वर, आवाटी, वरकटणे, खांतगाव, दिवेगव्हाण, पारेवाडी, टाकळी रा, कोर्टी/गोरवाडी/हुलगेवाडी/ कुस्करवाडी, विहाळ, कुंभेज, भिलारवाडी, वंजारवाडी, पांडे/खांबेवाडी/धायखिंडी, मिरगव्हाण, अर्जुननगर, बिटरगाव वा, सालसे, सावडी, लिंबेवाडी, कामोणे, हिसरे, जेऊर, कविटगाव, कंदर, उंदरगाव, निमगाव ह, आळसुदे. सर्वसाधारण (महिला) : तरटगाव, मोरवड, पाडळी, पोथरे / निलज, शेटफळ, घोटी, मांगी, पागरे, जिंती, अंजनडोह, खडकी, रोशेवाडी, हिवरे, सरपडोह, वांगी नं. १, वांगी नं. २, वांगी नं. ३, भिवरवाडी/वांगी नं. ४, केम, कावळवाडी, कात्रज, मांजरगाव, बोरगाव, हिवरवाडी, कुंगाव, सांगवी, पोमलवाडी, सोगांव, पोंधवडी, वडगाव द/ वडगाव

उ, भोसे, रामवाडी आणि देवीचामाळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments