Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरसमधील १०३ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

 माळशिरसमधील १०३ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर


माळशिरस (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींची सरपंच सोडत जाहीर झाली आहे. यात ५० जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असुन त्यात महिला प्रवर्गासाठी २५ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २८ जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यात १४ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी २४ जागा आरक्षित करण्यात आल्या असून त्यात अनुसूचित जाती महिलांसाठी १२ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती-जमातीसाठी एक जागा असुन या जागेसाठी माळीनगर ही ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आली आहे.


माळशिरस तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवार, दि. १५ रोजी पंचायत समिती सभागृहात प्रांत अधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार अमोल कदम यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. याआधी काढण्यात आलेली सरपंच आरक्षण सोडत रद्द झाल्याने नव्याने ही सोडत काढण्यात आली आहे.


सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे-

• सर्वसाधारण फडतरी, गिरवी, वाफेगाव, माळखांबी, बोरगाव, माळेवाडी (बोरगांव), मिरे, कळंबोली, पुरंदावडे, तरंगफळ, उंबरे (वेळापूर), उघडेवाडी, धर्मपुरी, बांगर्डे, येळीव, गारवाड, (मगरवाडी) मारकडवाडी, दसुर, पिंपरी, धानोरे, लोंढे मोहितेवाडी, रेडे, जांबुड, दहिगाव, खंडाळी (दत्तनगर).


• सर्वसाधारण महिला- तांबेवाडी, मोरोची, कन्हेर, तिरवंडी, इस्लामपूर, जळभावी, कोंडबावी (वटपळी), आनंदनगर, विझोरी, बाभुळगाव, नेवरे, विठ्ठलवाडी, शेंडेचिंच, चांदापुरी, कुसमोड, कदमवाडी, गुरसाळे, विजयवाडी, यशवंतनगर, गिरजणी, शिंदेवाडी, वेळापूर, शिंगोर्णी, वाघोली, पळसमंडळ.


• नागरिकांचा मागास प्रवर्ग- सदाशिवनगर, एकशिव, पानीव (घुले वस्ती), डोंबाळवाडी (कुरबावी), झिंजेवस्ती (पिलीव), हनुमानवाडी, कुरभावी, कचरेवाडी, चाकुरे (प्रतापनगर), चौंडेश्वरवाडी, सवतगव्हाण, फळवणी, कारंडे, तांबवे.


• नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- लवंग, बोंडले, बागेचीवाडी, कोथळे, डोंबाळवाडी (खुडूस), निमगाव, पिसेवाडी, सुळेवाडी, गोरडवाडी, गणेशगाव, पिरळे, लोणंद, झंजेवाडी (खडूस), तोंडले.


• अनुसूचित जाती - कदमवाडी, देशमुखवाडी, उंबरे, दहिगाव, मेडद, मांडकी, मळोली, कोळेगाव, तामशिदवाडी, तांदुळवाडी, जाधववाडी, भांबुर्डी, बचेरी.


• अनुसूचित जाती महिला- फोंडशिरस (मोटेवाडी), कोंढारपट्टा, मांडवे, पिलीव, पठाणवस्ती, बिजवडी, मोटेवाडी (माळशिरस), संग्रामनगर, खळवे, भांम, खुडूस, संगम.


• अनुसूचित जाती-जमाती- माळीनगर.


Reactions

Post a Comment

0 Comments