Hot Posts

6/recent/ticker-posts

रस्त्यांवर कचरा; लाखोंचा दंड

 रस्त्यांवर कचरा; लाखोंचा दंड

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  महापालिकेच्या वतीने शहरात 'अपनाओ बिमारी भगाओ' या अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. रस्त्यांवर टाकण्यात आलेला कचरा संकलन करत रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.


महापालिकेचे कचरा संकलनाचे तीनतेरा वाजले आहेत. घंटागाडी येत नसल्याने घरातील कचरा रस्त्यांवर टाकला जात आहे. सोलापूरच्या कचऱ्याचा विषय पावसाळी अधिवेशनात गाजला आहे. आ. विजयकुमार देशमुख यांनी प्रश्न विचारत शासनास जाब विचारला आहे.


बहुतांश भागात साचलेला तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा पावसामुळे जागेवर कुजून दुर्गंधी पसरून शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान अंतर्गत मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडून कचरा घंटागाडीमध्ये टाकताना कुचराई होत आहे. दरम्यान पालिकेने रस्त्यांवरील २०३ पैकी १६३ ठिकाणे कचरा मुक्त केली. त्या ठिकाणी रांगोळी काढून स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूरचा संदेश दिला आहे. महापालिका प्रशासन स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर बाबत गंभीर आहे. मात्र नागरिक मात्र उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे. कचरा स्वच्छ केलेल्या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आता कचरा रस्त्यांवर टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाईकरण्याची गरज आहे.


चौकट 

महापालिका स्वच्छता मोहिम

अस्वच्छतेवर झाले मार्गदर्शन

१९ शाळांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात आली. अस्वच्छतेमुळे होणारे परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येत आहे. काही शाळांमध्ये स्वतः अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी मार्गदर्शन करत आहेत.


३.३८ लाखांचा दंड

मोहिमेंतर्गत एक हजार १५० नागरिकांकडून ३ लाख ३८ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

शहरातील एकूण २०३ पैकी १६३ ठिकाणे कचरा मुक्त करत पाचशे टन कचरा गोळा केला आहे.


शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मोठी यंत्रणा राबवली जात आहे. घंटागाड्या वाढवण्यात येत आहेत.. घंटागाड्याचे मार्ग फेऱ्या वाढवल्या आहेत. रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासाठी झोन निहाय पथके नियुक्ती केली आहेत.

- रवी पवार, अतिरीक्त आयुक्त, महापालिका


Reactions

Post a Comment

0 Comments