पाच वर्षे ठाण मांडलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मारलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सध्या महापालिकेत चालू आहे. सामान्य प्रशासन विभाग विभागाकडून लिपिक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ लेखनिक अशा शंभर कर्मचाऱ्यांची यादी तयार आहे.
यापूर्वी देखील अशाच बदल्या करण्यात होत्या मात्र या बदल्यांमध्ये अनेक सावळा गोंधळ गोंधळ दिसून येत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना मुक्त केले आहे मात्र ज्या विभागात बदली झाली त्या ठिकाणी रुजू करून घेतले नाही, तर काही विभागात काम नसल्यामुळे बसून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. अनेक कर्मचारी अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याने त्या विभागात त्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. आपल्या शिवाय कोणतीही काम होत नाही, असा ठाम विश्वास असल्याने प्रकरणे प्रलंबित ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून पाच वर्षापेक्षा जास्त काळ एकाच विभागात, एकाच टेबलावर ठाण मारलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची सत्र सुरू केले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून विविध विभागातील अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. ती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना सादर केली आहे. या संदर्भातल्या बदल्याचे आदेश लवकर काढले जाणार आहेत.
चौकट
बदल्यांमध्ये सावळा गोंधळ
यापूर्वी करण्यात आलेल्या बदल्यामध्ये सावळा गोंधळ झाला आहे. अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. ज्या ठिकाणी बदली झाली त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी रूजू करून घेत नाहीत. रूजू करून घेतले तर काम नाही, तर काही कर्मचाऱ्यांची बदली झाली तरी अद्याप पदमुक्त केले नाही वेतन होण्यापुर्वी बदली झाल्यामुळे नवीन विभागात रूजू झाल्यानंतर जुन्या विभागात केलेल्या कामाचे वेतन नवीन विभागात काढले गेले नाही त्यामुळे चालू महिन्याच्या वेतनात मोठा आर्थिक फटका कर्मचाऱ्यांना सहन करवा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे.
बदली होणारे विभागनिहाय संख्या
मुख्यलेखापरिक्षक, अंतर्गत लेखा परीक्षक : प्रत्येकी एक, आरोग्य विभाग ७, विधान सल्लागार २, अंतर्गत लेखापरिक्षक २, अतिक्रमण विभाग १, अभिलेखापाल ३, जनसंपर्क कार्यालय १, निवडणूक जनगणना १, झोन एक १, नगर अभियंता ३, नगर सचिव १, भूमी मालमत्ता विभाग ३, मंडई विभाग २, मालमत्ता विभाग गवसू १, मालमत्ता विभाग शहर ६, मालमत्ता विभाग हद्दवाढ १९, मुख्यलेखा निरीक्षक २, मुख्यलेखापाल ७, विद्युत विभाग १, झोन कार्यालय पाच २, झोन कार्यालय सहा २, झोन कार्यालय दोन ४, झोन कार्यालय आठ २, झोन कार्यालय सात १, सामान्य प्रशासन विभाग ७, पाणीपुरवठा विभाग १. वरीष्ठ लिपीक एकूण १३.
0 Comments