त्या वीज वितरण अधिकाऱ्यावर कारवाई करावी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डीपीचा वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या परणे आंदोलनाची दखल न घेणाऱ्या मोहोळ तालुक्याच्या वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अधिकाऱ्यावर कारवाई करून खंडित केलेला वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याची मागणी माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे व जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी मुंबई येथे मंत्रालयात बीज विभागाचे उपसचिव कृष्णा कराड यांच्याकडे केली आहे.
थकीत वीज बिलासाठी मोहोळ तालुक्यातील पापरी आणि खंडाळी या दोन गावांतील शेतकऱ्यांच्या डीपीचा वीजपुरवठा बीजवितरण अधिकाऱ्यांनी खंडित केला आहे. या प्रकरणी प्रभाकर देशमुख
कंपनीच्या माजी मंत्री ढोबळे व देशमुख यांचे उपसचिवांना निवेदन यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून
मोहोळ येथील बीज वितरण कंपनीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, याची दखल घेतली जात नसल्याने प्रा. ढोबळे यांच्यासह देशमुख यांनी उपसचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे आंदोलन सुरू असताना येथील उपकार्यकारी अभियंता साधे शेतकऱ्यांशी
चर्चा सुद्धा करायला तयार नाहीत. शेतकरी आणि देशमुख भेटून चर्चा करावयास गेले असता त्या अधिकाऱ्याने मला सोलापूर येथे बैठक असल्याचे सांगून बेजबाबदारपणे उत्तर देत उद्धट वागणूक दिली. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. शासन शेतकऱ्यांचे बिल शून्य केले असल्याचा दावा
करीत असतानासुद्धा वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीज बिलाच्या वसुलीसाठी तगादा लावत आहेत.
शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये वीज बिल भरण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, एकूण थकीत रकमेच्या दहा टक्के रक्कम भरण्यासही अधिकारी सांगत आहेत. अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी
करण्यात आली आहे. यावेळी पोपट सावंत उपस्थित होते.
0 Comments