यशस्वी गुणवंताचा गौरव ; सुरवसे परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- खळवे गावाचे गावपण टिकले आहे ते म्हणजे येथील सुरवसे परिवाराने गावातील कुणी जरी आपल्या गावाचे नाव बाहेर जाऊन रोशन केले तरी त्यांचा सन्मान करून त्यांच्या आत्मविश्वासाला बळकटी देऊन त्यांना काम करण्याची आणि त्यातून देश सेवा करण्याची ऊर्जा या सुरवसे परिवाराने त्यांच्या मनामध्ये निर्माण केली आहे.
खळवे गावातील चि निखिल उत्तम ननवरे हा विद्यार्थी नुकताच चार्टर्ड अकाउंट परीक्षा उत्तीर्ण झाला असुन त्याने गावाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.तसेच याच गावातील डॉ. विशाल आणासो नाईकनवरे यांनी केंद्र व राज्य शासन आयोजित कायाकल्प आरोग्य प्रकल्पात सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे, म्हणून गावातील प्रतिष्ठित असा सुरवसे परिवार जो नेहमीच गावातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतो अशा परिवाराकडून म्हणजेच संजय सुरवसे, पै. सुधीरभाऊ सुरवसे, सुनील आप्पा सुरवसे व संपुर्ण सुरवसे परिवार यांनी चि. निखिल व त्याचे वडील उत्तम ननवरे व डॉ. विशाल व त्यांचे वडील आण्णासो नाईकनवरे यांचा सन्मान केला.
या सत्कार सोहळ्यासाठी गावातील प्रतिष्ठित मान्यवर रेवन ननवरे, गणेश प्रधाने, भगवान चव्हाण, संताजी माने देशमुख, नवनाथ ननवरे, सोमनाथ ननवरे, किसन ननवरे, सुधाकर ननवरे पपु ननवरे, दादासाहेब ननवरे, गणेश ननवरे ,सुखदेव भुसणर, संजय ननवरे, अमोल माने देशमुख, पै.किरण कदम, तानाजी जगताप,उपसरपंच विनोद जाधव,अमोल देशमुख,विजय देशमुख व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments