Hot Posts

6/recent/ticker-posts

सिनेभिनेते सुनील साबळे यांना कलागौरव पुरस्कार

 सिनेभिनेते सुनील साबळे यांना कलागौरव पुरस्कार




माढा (कटूसत्य वृत्त):- दिग्दर्शक रमाकांत सुतार यांच्या सत्यआरंभ संस्था पुणे आयोजित आणि आदित्यराजे मराठी प्रोडक्शन पुणे निर्मिती मीडिया सोल्युशन्स, पद्मश्री शंकर बापू आपेगावकर ट्रस्ट धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने सह आयोजित कलामहर्षी चित्र सूर्य कै. बाबुराव पेंटर जीवन गौरव पुरस्कार 2025 हा पुरस्कार सोहळा नुकताच कै. रामचंद्र बनकर हायस्कूल हडपसर या ठिकाणी पार पडला. या जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे  उद्घाटक, अध्यक्ष म्हणून आदरणीय शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर  उपस्थित होते. सत्कारमूर्ती चित्रपट, नाट्य अभिनेते भरत जाधव लोककलावंत रघुवीर खेडकर स्वागताध्यक्ष सुनील दादा बनकर आणि प्रमुख उपस्थितीमध्ये वैशालीताई बनकर, वामनदादा नलावडे, अजित राजे मराठे, रोहित बेलदरे हे कार्यक्रमास उपस्थित होते. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात आत्तापर्यंत केलेल्या यशस्वी कार्याचा गौरव म्हणून आदरणीय भरत जाधव यांना कलामहर्षी चित्रसूर्य बाबुराव पेंटर जीवन गौरव पुरस्काराने आदरणीय शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रातल्या अनेक यशस्वी मान्यवरांचा सन्मान  या कार्यक्रमात करण्यात आला . सिनेअभिनेते सुनील रामदास साबळे यांनी आतापर्यंत अनेक नाटक, चित्रपट, लघुचित्रपट, वेबसारिज या मध्ये अभिनय केला आहे त्यांना अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते त्यांना कळगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments