इक्बाल मैदान स्वच्छ करा;अन्यथा कचरा पालिकेत आणून फेकणार- फारूक शाब्दी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील प्रसिद्ध असे इक्बाल मैदान सद्यस्थितीत कचरा डेपो झाले आहे. इक्बाल मैदान येथील कचरा वेळेवर स्वच्छ न केल्याने आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरली जात आहे.एमआयएम पक्षाचे सोलापूर आणि मुंबई शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंगळवारी सायंकाळी पाहणी केली. इक्बाल मैदानात झालेल्या कचराकुंडीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सोलापूर महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शुक्रवार पेठ,बाशा पेठ,शनिवार पेठ आदी भागातील नागरिक रोगीष्ठ होत चालले आहेत.एमआयएमचे शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवकांसोबत इक्बाल मैदानाची पाहणी केली.माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी व शौकत पठान यांनी महानगरपालिका अधिकाऱ्याना कॉल केला.एमआयएमचे शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी पालिका अधिकाऱ्याना इशारा दिला. लवकरात लवकर इक्बाल मैदानाची स्वच्छता करावी अन्यथा येथील कचरा अधिकाऱ्याच्या दालनात आणून फेकणार असा इशारा दिला.
इक्बाल मैदान हे अनेक दिवसांपासून अस्वच्छतेचे केंद्रबिंदू झाले आहे.त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण फेकली जात आहे.लहान लहान मुलं इक्बाल मैदानात येऊन गांजा सदृश अंमली पदार्थांचे सेवन करत आहेत.वेगवेगळ्या ठिकाणी असलेला आजोरा इक्बाल मैदान येथे टाकण्यात येऊ लागला आहे.अशी संतप्त प्रतिक्रिया एमआयएमच्या पाधिकाऱ्यांनी यांनी दिली.फारूक शाब्दी व यांनी थेट महानगरपालिका अधिकाऱ्याना कॉल करून येथील कचरा तुमच्या दालनात आणून फेकू का,दोन दिवसांत इक्बाल मैदान स्वच्छ झाले नाही तर एमआयएम पक्षा तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments