सोलापूरच्या कचर्याचा विषय विधानसभेत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कचरा संकलनाचे खासगीकरण करण्यात आले आहे. स्वच्छ अभियाना अंतर्गत कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. तरी शहरात गेल्या दहा वर्षांपासून घाणीचे साम्राज्य आहे. ठिकठिकाणी कचरा साठलेला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील कचर्यांचा प्रश्न कधी निकाली निघणार, असा प्रश्न शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय देशमुुख यांनी सोमवारी (दि. 14) विधानसभेत उपस्थित केला.
शहरातील कचरा संकलनाचा मक्ता पुण्याच्या वॉटरग्रेज कंपनीला दिला आहे. या मक्तेदारांने सब मक्तेदारांच्या माध्यमातून कचरा संकलनाची जबाबदारी दिली आहे. दोनशे घंटागाड्याच्या माध्यमातून कचरा संकलन केले जात आहे. मात्र मक्तेदारांची यंत्रणा तोडकी असल्याने घंटागाड्या प्रभागात येत नाहीत त्यामुुळे शहरात सर्वत्र कचर्यांचे ढीग निर्माण झाले आहेत. शहर कचरा मुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन उपाययोजना करणार आहे का असा प्रश्न आ. देशमुख यांनी सरकारला विचारला. त्याशिवाय शहरांमध्ये सहा झोनमध्ये कचर्याचे डंपिंग स्टेशन आहेत. हे डंपिंग स्टेशन पूर्वी नागरी वस्तीच्या बाहेर होते. पण आता शहराची वाढ झाल्यामुळे ते शहरी भागामध्ये आहेत.
डंपिंग स्टेशन येथे देखील कचर्याचा ढीग साचलेला आहेत. त्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. डंपिंग स्टेशन तुम्ही नागरिक वसाहतीच्या बाहेर नेणार आहात का असा सवालही आ. देशमुुख यांनी यावेळी उपस्थित केला.
चौकट
महापालिकेकडून चुकीची माहिती
आ. देशमुख यांनी शहरातील डंपिंग स्टेशन विषय उपस्थित केला होता. मात्र शासनाकडून शहरा बाहेरील बायो एनर्जी प्लांटची माहिती दिली. या ठिकाणी सात लाख टनाचा कचरा डंप झालेला होता. पाच लाख टन काढलेला आहे. स्प्रे मारण्याची प्रक्रिया चालू असल्याचे सांगत हा मोठा प्रकल्प आहे. शहरातील सर्व कचरा गोळा केला जातो. कचरा हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे उत्तर दिले. महापालिका प्रशासनाकडून चुुकीची माहिती दिल्याचे यावरून लक्षात येते.
0 Comments