स्थानीक स्वराज्य संस्था निवडणूकांसाठी दीलीप मानेंची राजकीय समीकरणांची जुळणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला हजेरी लावली. त्यांच्या या उपस्थितीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दिलीप मानेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह माजी आमदार दिलीप माने हे देखील मुखमंत्र्यांच्या भेटीला उपस्थित होते.
अलीकडेच झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप मानेंनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी एकादशी निमित्ताने कार्यक्रम आटपून परत निघताना सोलापूर विमानतळवर दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र या भेटीमुळे राजकिय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
नुकतंच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट बघायला मिळाला होता. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल करण्यात आला होता. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. यात भाजपला फुल्ल सपोर्ट देत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेस नेते दिलीप माने यांची निवड झाली होती. या राजकीय घडामोडींचा परिणाम आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकांमध्ये उमटणार असून दक्षीण सोलापूरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चीन्हे आहेत.दुसरीकडे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आपण एकत्रितपणे लढू आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील तीनही गटांमधून विजय मिळविण्याचा प्रयत्न आपण करू, असा प्रस्ताव माजी आमदार दिलीप माने यांनी माजी आमदार यशवंत माने यांना दिला. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांची नव्याने मांडणी होण्याचे संकेत आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे श्रीधरराव मार्तंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात बोलताना दीलीप माने यांनी यशवंत माने यांच्याशी राजकीय बेरीज करण्याचे संंकेत दीले असून.दीलीप माने हे राजकारणातील मातब्बर नेते समजले जात असल्याने आगामी काळात दीलीप माने यांच्या भूमीकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
0 Comments